Goa Drug Case | ड्रग्ज प्रकरणी प्रलंबित खटल्याची सुनावणी 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश

Goa Drug Case | अमलीपदार्थप्रकरणी अटक केलेल्या डॉमनिक नेके याच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या तीन वर्षे उलटून गेली आहेत
Goa High Court
Goa High CourtPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

अमलीपदार्थप्रकरणी अटक केलेल्या डॉमनिक नेके याच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या तीन वर्षे उलटून गेली आहेत त्यामुळे या खटल्यावरील सुनावणी लवकरात लवकर घेऊन ती पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याचा जामीन अर्ज निकाली काढला.

Goa High Court
Omkar Elephant | 'ओंकार' हत्तीचा नेतर्डे परिसरात मुक्काम! जयराम गवस यांच्या काजू बागेत दर्शन झाल्याने ग्रामस्थांची धाकधूक

कक्षाच्या अमलीपदार्थविरोधी पोलिस पथकाने १३ जानेवारी २०२३ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे संध्याकाली सव्वाचारच्या सुमारास मोरजी - पेडणे येथील बसस्थानकाच्या आवारात संशयित डॉमनिक नेके याला ताब्यात घेतले होते.

त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५६ ग्रॅम कोकेन सापडले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावरील सुनावणी सध्या सुरू आहे. तीन वर्षे उलटून गेली तरी खटला संपत नसल्याने त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

Goa High Court
Sex Scandal Case | कुडचडे प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार! पीडितांना न्याय देण्यासाठी बालहक्क आयोग मैदानात

त्यापूर्वी त्याने चारवेळा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तीनवेळा त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता तर एकदा त्याने जामीन अर्ज मागे घेतला होता. संशयिताच्या खटल्यावरील सुनावणी सुरू आहे व ती पुढील चार महिन्यात संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खटला आणखी लांबणार नाही.

त्याने अटकेवेळी दिलेल्या व अर्जात नमूद केलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. त्याने दिलेल्या पत्त्यामध्येही साम्य नाही. त्याचा उपजीविकेचा स्रोत काय याची माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे खटला सुरू असताना जामीन देणे योग्य होणार नाही, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news