Goa Pernem Municipal Staff Pending Salaries |सांगा कसे जगायचे..? रडत रडत की...

पेडणे पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिने थकीत : चरितार्थ चालविणे झाले कठीण
money
money pudhari file photo
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे नगरपालिकेतील १८ कामगार व कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. रस्त्यावरील केरकचरा उचलणे, परिसराची साफसफाई करून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मेहनतीचा मोबदला मिळालेला नाही. किराणा, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, वीजबिल आणि बँकेच्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मासिक वेतनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काम सुरू ठेवूनही वेतन न मिळाल्याने घरखर्च भागवणे, मुलांच्या गरजा पूर्ण करणे आणि जबाबदाऱ्या पार पाडणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे.

पालिकेकडे वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ६३ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले वाहन वापराविना उभे असून, ते सुरक्षित ठेवण्यासाठी निधी उपलब्ध असल्याची चर्चा आहे. वाहनाच्या देखभालीसाठी निधी मिळतो, तर शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांच्या वेतनासाठी का नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तीन महिन्यांचे वेतन देण्यास विलंब का होत आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

पालिकेने लाखो रुपये खर्चुन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला. प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणारा प्रकल्पही उभारण्यात आला; मात्र तो अद्याप कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे अपेक्षित आर्थिक फायदा पालिकेला मिळत नसल्याची चर्चा आहे. सध्या रस्त्यावरील बाजारातून मिळणाऱ्या महसुलावर पालिकेला मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत आहे. महसूलवाढीसाठी नवीन स्रोत निर्माण करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

money
Goa Karapur Assault Case Arrest |कारापूर हाणामारी प्रकरणात एकाला अटक

प्रशासकांनी हस्तक्षेप करावा

प्रशासकांनी तातडीने हस्तक्षेप करून थकीत तीन महिन्यांचे वेतन अदा करावे आणि यापुढे दरमहा वेळेवर वेतन मिळेल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.

money
Goa ACB Raid Gauresh Naik | निलंबित पोलिस गौरेश नाईकच्या घरावर एसीबीचा छापा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.