Soham Naik Case: अश्लील नावाने व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायची व्हिडीओंची देवाण-घेवाण

शाळकरी मुलांना अश्लीलतेच्या जाळ्यात ओढण्याचा सोहमचा प्रयत्न
Soham Naik Case
Soham Naik Casefile photo
Published on
Updated on

Soham Naik Case

मडगाव : कुडचडे परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. नगरसेवकाच्या पुत्राचा या प्रकरणात संबंध असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सोहम सुशांत नाईक या युवकाने केवळ अल्पवयीन मुलींनाच लक्ष्य केले नसून शेकडो निरागस शाळकरी विद्यार्थ्यांना अश्लीलतेच्या जाळ्यात ओढल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत.

सविस्तर माहितीनुसार, सोहम नाईक व त्याच्या काही मित्रांकडून एका अश्लील नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप चालवला जात असल्याचे उघड झाले आहे. या ग्रुपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओंची देवाण-घेवाण सुरू होती.

Soham Naik Case
Soham Naik Case | पद, पैसा मुलींवर हात टाकण्याचा परवाना ?

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपवर दररोज १० ते १२ पॉर्न स्वरूपाचे व्हिडीओ अपलोड केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे या ग्रुपमध्ये जवळपास एक हजार सदस्य असून त्यामध्ये कुडचडे परिसरातील १४ ते १६ वयोगटातील शेकडो शाळकरी मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे एका प्रतिष्ठित कुटुंबातील अल्पवयीन मुलीला आरोपीने स्वतःचे अश्लील फोटो पाठवून तिच्याकडून आक्षेपार्ह फोटो मागण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या त्या मुलीने ही बाब आपल्या लहान भावाला सांगितली. मात्र, ही गोष्ट समजताच संतापलेल्या संशयिताने काही साथीदारांसह संबंधित मुलीच्या घरी जाऊन धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्लील नाव असलेल्या त्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये सहभागी असलेले अनेक सदस्य एकमेकांना ओळखत नसल्याचेही समोर आले आहे. काही शाळकरी मुलांनी सांगितले की, त्यांना थेट सोहम नाईक याने या ग्रुपमध्ये अॅड केले होते. विशेष म्हणजे या ग्रुपमधील प्रौढ व्यक्ती शाळकरी मुलांकडून अपलोड केल्या जाणाऱ्या अश्लील स्वरूपाच्या व्हिडीओंना ओकेची खूण (थंब) दाखवत होते. काही मुलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अश्लील स्वरूपाचे हे व्हिडीओ चक्क वर्गात बसून पाहिले जात होते. सोहम याच्या अटकेनंतर बराच काळ या ग्रुपवर कोणताही व्हिडीओ अपलोड झालेला नव्हता, असेही समोर आले आहे.

Soham Naik Case
Goa crime | ते पिता-पुत्र झिजवताहेत राजकारण्यांचे उंबरठे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news