Goa crime | ते पिता-पुत्र झिजवताहेत राजकारण्यांचे उंबरठे

दै. 'पुढारी'च्या वृत्ताने दक्षिण गोव्यात खळबळ
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

मडगाव : नवनिर्मित कुशावती जिल्ह्याला आपल्या विकृत कारवायांनी कुप्रसिद्धीस आणलेल्या त्या नगरसेवक पुत्राचे कारनामे उघड झाल्याने त्यातून सुटण्यासाठी आता दोघेही राजकारण्यांचे उंबरठे झिजवत आहेत. त्या नगरसेवक पुत्राचे थक्क करणारे एक एक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. त्याच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींनी शाळा कायमची सोडली आहे. आपले वडील नगरसेवक आहेत. त्यांच्या फार ओळखी आहेत, त्यामुळे आपले पोलीस काहीच वाकडे करू शकणार नाहीत असे त्याने आपल्या मित्रांना बोलून दाखवले होते.

आलिशान गाड्यांची मुलींना भूल

त्याच्या आलिशान गाड्यांची भूल मुलींना पडायची. मुलींच्या नकळत त्यांचे अत्यंत अश्लील प्रकारचे व्हिडीओ काढणे आणि नंतर त्या व्हिडीओची भीती दाखवून त्यांना पुन्हा बोलावून आणणे हे नित्यचेच प्रकार बनले होते. त्यातील एका मुलीने 'पुढारी'जवळ बोलताना दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असताना तो वाटेल तेव्हा तिला व्हिडीओ कॉल करत असे. अंगावरील कपडे उतरव नाहीतर शारीरिक संबंधांचा जुना व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी तो देत असे. त्याने कित्येक वेळा तिला ब्लॅकमेल केले होते. आपण त्याच्या भीतीपोटी सांगेल ते करायचे. शेवटी आपण मोबाईल फोन वापरणे बंद केल्याचे ती म्हणाली. गावात बेताची परिस्थिती असल्याने आम्ही गोव्यात आलो. वडिलांना हे समजले तर त्यांना धक्का सहन होणार नाही, असे ती म्हणाली.

त्याच्या जवळच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याच्याजवळ सुमारे ५२ व्हिडीओ आहेत. प्रत्येक व्हिडीओमधील मुलगी वेगळी आहे. दारूच्या नशेत त्याने ते व्हिडीओ त्याच्या बऱ्याच मित्रांना पाठवल्याचे समोर आले आहे. यापूर्वी बुलेट चोरीपासून वनखात्याची लाकडे चोरण्यापर्यंत अनेक प्रकरणांत त्याला पकडण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी वडिलांनी आपले राजकीय वजन वापरून त्याची सुटका केली होती.

नग्न फोटो केले व्हायरल

दहावीत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला कुडचडे येथील मडढेर नावाच्या डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर बुलेटच्या टाकीवर झोपलेल्या अवस्थेतील तिचे नग्न व्हिडीओ काढून त्याने ते व्हायरल केले होते. नगरसेवक पुत्राच्या कृत्यांना दैनिक पुढारीमधून वाचा फोडताच संपूर्ण दक्षिण गोव्यात खळबळ माजली आहे.

दैनिक पुढारीमधून या प्रकरणाला वाचा फुटताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकाराविषयी चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्याचे समजते. सविस्तर माहिती मिळवण्यासाठी सीआयडी विभागाला सक्रिय करण्यात आले असून राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे गंभीर पडसाद उमटू लागले आहेत.

अल्पवयीन मुलीच्या भावनेशी खेळून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात सहसा पीडित मुली किंवा त्यांचे पालक बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. अशावेळी सुमोटो पद्धतीने तक्रार नोंदवून तपास होणे अतिशय गरजेचे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपण पोलिसांकडे करणार असल्याची प्रतिक्रिया महिला संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news