Arvind Kejriwal | "भाजप कसले राक्षस पाळत आहे?" कुडचडे शोषण प्रकरणावरून अरविंद केजरीवाल यांचा घणाघाती वार

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल; कुडचडे प्रकरणावरून गंभीर आरोप
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणावरून भाजप सरकारवर निशाणा साधत भाजप आपल्या काळात कशा प्रकारचे राक्षस पाळत आहे, अशी टीका केली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

Arvind Kejriwal
Porvorim Fake Currency Case | पर्वरीतील एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा करणारा जेरबंद

केजरीवाल यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत दावा केला की, गोव्यात भाजपशी संबंधित एका नगरसेवकाच्या मुलाकडून गेल्या तीन वर्षांत सुमारे ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले असून त्यांचे चित्रीकरण करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.

त्यांनी या घटनेला अत्यंत घृणास्पद संबोधत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना संरक्षण मिळणे समाजासाठी अत्यंत धोकादायक असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.

Arvind Kejriwal
Goa Soham Naik Case | गोव्याला विकृतीचा विळखा! सोहम नाईक प्रकरणाने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

त्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आणि पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारकडून तत्काळ स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news