

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याची आपल्याला पूर्ण जाणीव असून महिन्याभरात त्यावर सर्व समावेशक तोडगा काढणे थकबाकी वितरित करणे व इतर सर्व बाबतीत पूर्णपणे दिलासा देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली.
गोव्यातील दग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध आधार आणि खरेदी किमतींमध्ये सुधारणा करण्यात यावी. दुधाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात यावी. सहकारी संस्थांकडून दूध खरेदीच्या किमती वाढवण्यात याव्यात व इतर मागण्या संदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा संकुलात भेट घेऊन निवेदन सादर केले व विविध मागण्या सादर केल्या, तसेच एकूणच दध व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्याची माहिती अध्यक्ष वैभव परब, प्रमोद सिद्धघे यांनी दिली. यावेळी आदिनाथ परब, नितीन पिलर्णकर, गोविंद नाईक, संतोष गावस उपस्थित होते. दुग्ध व्यवसाय हा गोव्याच्या शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे,
जो हजारो कुटुंबांना उपजीविका प्रदान करतो आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करतो. गोवा सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पावले उचलली असली तरी, अलीकडच्या आव्हानांमुळे त्यांच्या व्यवसायाच्या व्यवहार्यतेला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. पशुखाद्य, चारा आणि मजुरांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या किमतींशी जुळवून घेण्यासाठी सध्याच्या दुग्ध आधार आणि खरेदी किमोंमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे लहान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त, गोव्यातील सहकारी संस्थांकडून दूध खरेदी किमती शेजारच्या राज्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत. त्याबाबत तातडीने विचार
...तर व्यवसायाकडे तरुण वळतील
दूध किमतींमध्ये सुधारणा केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. दुग्ध व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढेल आणि स्थानिक दध उत्पादनात होणारी घट रोखता येईल. हे 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत स्वावलंबनाला चालना देण्यासाठी सरकारच्या उद्दिष्टांशी देखील सुसंगत असेल असेही शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक : डॉ. शेट्ये निवेदनाच्या प्रति पशु संवर्धन मंत्री व खात्यालाही सादर करण्यात आल्या आहेत. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचे असून धवलक्रांतीसाठी तरुणांना सामावून घेणे तसेच इतर बाबतीत ज्या त्रुटी आहेत, दर वाढ, नियमित आधारभूत किमतीचे वितरण या सर्व बाबतीत मुख्यमंत्री डॉ. सावंत पूर्ण सकारात्मक असून महिना भरात सर्व बाबतीत योग्य विचार होईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.