Goa Marathi Rajbhasha | मराठीला राजभाषेचा दर्जा द्या; अन्यथा...
पणजी : पुढारी वृत्तसेवा
मराठीला राजभाषेचा दर्जा द्या; अन्यथा सत्ता गमवाल, असा इशारा साहित्य पुरस्कार प्राप्त लेखिका लक्ष्मीताई जोग यांनी सरकारला मातृशक्ती मेळाव्यात दिला. मराठी राजभाषेच्या चळवळीने आता वेग घेतला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन महिला पूर्ण ताकदीनिशी उभ्या ठाकल्या आहेत. आता माघार ही नाहीच, असे उद्गार लक्ष्मीताई जोग यांनी विळीयण सांगे येथील श्री महालक्ष्मी सभागृहात आयोजित केलेल्या मातृशक्ती मेळाव्यात काढले. त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मराठी राजभाषेचा निर्णय सरकारने त्वरित घ्यावा अन्यथा त्याचे दुष्परिणाम म्हणून हाती असलेली सत्ता पण सरकारला गमवावी लागेल. सांगे प्रखंडाचे सचिव संजय कुर्डीकर यांनी मराठी राजभाषा निर्धार समिती स्थापनेचा हेतू स्पष्ट करत, गेल्या ४० अणीपासूनचा मराठी चळवळीचा सर्वांसमोर मांडला. तसेच आपल्या जीवनात मराठी भाषेचे योगदान, संदर्भ आणि आवश्यकता या संबंधी अनेक उदाहरणे दिली. मराठी प्राथमिक शाळा बंद होण्याबाबत कारण सांगताना ते म्हणाले की, 'शासनाच्या दुर्लक्षामुळे व अनास्थेमुळे हे घडते आहे आणि या सर्वांना उपाय एकच तो म्हणजे मराठीला राजभाषा घोषित करणे हा होय, असे त्या म्हणाल्या.

