Goa Assembly Monsoon Session | गोवा माईल्स टॅक्सीमुळे सरकारला साडेआठ कोटींचा महसूल

इतर टॅक्सी चालकांकडून महसूल नाही
Goa Miles Taxi
गोवा सरकारला माईल्स टॅक्सीकडून 8 कोटी 50 लाखांचा महसूल मिळालेला आहे. Pudhari News Network

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : गोव्यामध्ये गोवा माईल्सअंतर्गत ज्या 1500 टॅक्सी चालू आहेत. त्यांच्याकडून गोवा सरकारला मागील 4 वर्षात कराच्या रूपात 8 कोटी 50 लाखांचा महसूल मिळालेला आहे. मात्र, इतर खासगी पर्यटन टॅक्सीकडून कोणताही महसूल मिळत नाही. त्यामुळे सुमारे पाचशे कोटींचा महसूल सरकारचा बुडालेला आहे, असे स्पष्टीकरण वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज (दि.१८) विधानसभेत दिले.

Goa Miles Taxi
Goa News | गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर थोडक्यात बचावले

आमदार प्रवीण आर्लेकर यांचा गोवा माईल्ससंदर्भात प्रश्न

विधानसभेमध्ये शुन्य प्रहराला पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी गोवा माईल्सच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. व मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी काऊंटर बंद करण्याची मागणी केली होती. सदर टॅक्सी काऊंटरमुळे स्थानिक टॅक्सी चालकांना पर्यटक प्रवासी मिळत नसल्याचा दावा आर्लेकर यांनी केला. त्यावर माविन गुदिन्हो यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, गोवा माईल्स टॅक्सी ही कायदेशीर आहे. गोव्याचे टॅक्सीचालक या गोवा माईल्सशी संलग्न झाले आहेत.

Goa Miles Taxi
गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

टॅक्सी चालकांनी स्वतःचे अॅप सुरू करावे

टॅक्सी चालकांनी स्वतःचे अॅप सुरू करावे किंवा गोवा सरकारने सुरू केलेल्या अॅपला संलग्न व्हावे, असे आवाहन सरकारतर्फे वारंवार करूनही काही टॅक्सी चालक बाजूला राहिले आहेत. त्यामुळे सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. प्रवाशांना गोवा माईल्स आवडलेली आहे. त्यामुळे प्रवासी तिची मागणी करत आहेत, असेही माविन गुदिन्हो म्हणाले.

Goa Miles Taxi
म्हादई : कर्नाटक-गोवा संघर्षात ‘प्रवाह’

या प्रश्नावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो व बाणावलीचे आमदार वेन्सी वियेगस यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माविन गुदिन्हो यांना साथ दिल्यामुळे प्रवीण आर्लेकर एकाकी पडल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news