Goa - प्रियोळवरून भाजप-मगो युती तुटण्याची शक्यता

आमदार गोविंद गावडे यांच्यासमोर कोण याकडे लक्ष; अटीतटीची लढत होण्याची शक्यता
Goa
Goa political news
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

प्रियोळ मतदारसंघातून २०१७ मध्ये अपक्ष म्हणून निवडुन आलेले आणि नंतर मंत्रिपदाची धुरा सांभाळणारे गोविंद गावडे वांनी २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून ११,०१९ मते मिळवत विजय मिळविला. मात्र, त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी १०,८०६ मते मिळवत कडवी टक्कर दिली होती. सध्या भाजप आणि मगो यांच्यात युती असली, तसेच जिल्हा पंचायत निवडणुकाही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या असल्या, तरी आगामी विधानसमा निवडणुकीत ही युती कायम राहणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. युती झालीच तर प्रियोळ मतदारसंघ भाजपकडे राहणार की मगोच्या वाटबाला जाणार, आणि मतदारसंघ मगोला दिल्यास गोविंद गावडे यांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावरून भाजप-मगो युतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Goa
Goa Institute of Management | गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्ग कचऱ्याच्या विळख्यात

गेल्या दहा वर्षांत आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना गोविंद गावडे यांनी मतदारसंघात मजबूत जनाधार निर्माण केला आहे. विद्यमान आमदार म्हणून त्यांचाच उमेदवारीवर दावा असल्याचे मानले जाते. आदिवासी (एसटी) समाजाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख असून प्रियोळ मतदारसंघात एसटी मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणांच्या दृष्टीनेही त्यांची बाजू मजबूत मानली जाते. गेल्या दशकभरात केलेल्या विकासकामांचाही त्यांना लाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मागील निवडणुकीत त्यांना दहा हजारांहून अधिक मते मिळाल्याने त्यांचाहीं मजबूत दावा आहे प्रियोळ मतदारसंघ मगोध्या वाटचाला यावा, यासाठी पक्षाचे नेते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तसे न झाल्यास २०१७ आणि २०२२ प्रमाणे मगो युतीतून बाहेर पडून दीपक ढवळीकर पुन्हा मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू शकतात, अशीही राजकीय चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोविंद गावडे विरुद्ध दीपक ढवळीकर अशी अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर पक्षांचे अस्तित्व मर्यादित

प्रियोळ मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचे अस्तित्व तुलनेने मर्यादित राहिले आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३०३, आम आदमी पक्षाला २४५ आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाला २,५१७ मते मिळाली प्रियोळमध्ये मुख्य लढत भाजप आणि मगो यांच्यातच राहण्याची शक्यता आहे. युती कायम राहणार की तुटणार आणि मतदारसंघ कोणाच्या वाटणला जाणार, यावर येथील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

Goa
Goa Railway Tourism Growth | गोव्यात रेल्वेने 19.87 लाख पर्यटक दाखल

सुनील जल्मीही इच्छुक

गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आणि मगोने युती केली होती. त्यावेळी प्रियोळ विधानसमा मतदारसंघातील बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघ माजपला, तर वेलिंग-प्रियोळ मतदारसंघ मगोला देण्यात आला होता. बेतकी-खांडोळा मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले यांना ५,९८८ मते मिळाली; मात्र अपक्ष उमेदवार सुनील अल्गी भोमकर यांनी ८,०८१ मते मिळयत त्यांचा पराभव केला. या निवडणुकीत मगोनेच सुनील जन्मी यांना पाठबळ दिल्याची चर्चा होती. वेलिंग-प्रियोळ मतदारसंघातून मगोध्या आदिती गावडे या ८, १७६ मते मिळवत विजयी झाल्या. अपक्ष जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी हेही प्रियोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. प्रियोळ मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाल्यासही मगोकडे उमेदवार आहे असे वक्तव्य दीपक हवळीकर यांना केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news