Goa Institute of Management | गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्ग कचऱ्याच्या विळख्यात

Goa Institute of Management | दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याचा धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
Goa Institute of Management
Goa Institute of Management
Published on
Updated on

केरी : पुढारी वृत्तसेवा

साखळीतील देसाई नगर व हाऊसिंग बोर्ड परिसरालगत असलेला गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (जीआयएम) मार्ग सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला असून, रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या घाणीमुळे परिसराचे सौंदर्य विद्रूप झाले आहे. दुर्गंधी, भटकी जनावरे आणि संभाव्य रोगराईच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Goa Institute of Management
Sambhajinagar News : शहरात कचरा जाळण्याचे सत्र कायम

साखळी नगरपालिका क्षेत्रातील या मार्गावर रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग आता सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी गंभीर समस्या बनले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर ये-जा करतात.

अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी आरोग्यासाठी फेरफटका मारण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिक, अन्नकचरा, बाटल्या, कागद, थर्माकोल, बांधकामातील टाकाऊ साहित्य आणि घरगुती कचऱ्याचे ढीग साचल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. स्थानिक नागरिक आपली घरे स्वच्छ ठेवत असले तरी घरगुती कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

काही बाहेरील वाहनधारकही रात्रीच्या वेळी येथे कचरा टाकून जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या कचऱ्यामुळे भटकी कुत्री, डुकरे आणि गुरेढोरे येथे जमा होत आहेत. गुरे प्लास्टिकसह कचरा खात असल्याची धक्कादायक दृश्ये दररोज पाहायला मिळत आहेत. परिणामी जनावरांच्या आरोग्यालाही धोका या रस्त्याचा वापर करतात.

मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिक, अन्नकचरा, बाटल्या, कागद, थर्माकोल, बांधकामातील टाकाऊ साहित्य आणि घरगुती कचऱ्याचे ढीग साचल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. स्थानिक नागरिक आपली घरे स्वच्छ ठेवत असले तरी घरगुती कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Goa Institute of Management
Pimpri Chinchwad Garbage Problem: पिंपरीत स्वच्छतेचे फलक असूनही कचऱ्याचे ढीग; स्मार्ट शहर दाव्यांवर प्रश्नचिन्ह

काही बाहेरील वाहनधारकही रात्रीच्या वेळी येथे कचरा टाकून जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या कचऱ्यामुळे भटकी कुत्री, डुकरे आणि गुरेढोरे येथे जमा होत आहेत. गुरे प्लास्टिकसह कचरा खात असल्याची धक्कादायक दृश्ये दररोज पाहायला मिळत आहेत. परिणामी जनावरांच्या आरोग्यालाही धोका आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

पूर्वी या ठिकाणी 'येथे कचरा टाकू नये' असे सूचना फलक लावण्यात आले होते. मात्र, आज हे फलकच कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये झाकले गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे केवळ सूचना फलक लावून समस्या सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी गस्त वाढवून बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.

लोकांना वारंवार सूचना देऊनही काहीजण ऐकत नाहीत. ज्या भागांत कचरा संकलनाची सुविधा नियमितपणे उपलब्ध होत नाही, तेथील काही नागरिक हा कचरा येथे आणून टाकतात.

- सिद्धी प्रभू, सांखळी नगराध्यक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news