Goa Railway Tourism Growth | गोव्यात रेल्वेने 19.87 लाख पर्यटक दाखल

Goa Railway Tourism Growth | पर्यटन खात्याची माहिती; जानेवारी ते मे दरम्यानचे चित्र, संख्येत ६.८ टक्क्यांनी वाढ
Railway
Railway Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत रेल्वेमार्गे गोव्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत ६.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण १९,८७,८६२ प्रवासी रेल्वेने गोव्यात दाखल झाले, तर २०२५ मधील याच कालावधीत ही संख्या १८,६०,५६८ इतकी होती, अशी माहिती गोवा पर्यटन खात्याने दिली.

Railway
Goa Rent A Car Accident Statistics | रेंट-अ-कार चालकांच्या बेपर्वाईला हवा लगाम

पर्यटन खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२६ मधील ही वाढ २०२४ च्या तुलनेतही ६.५ टक्के अधिक आहे. त्यामुळे गोवा हे भारतातील सर्वाधिक सहज उपलब्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक बळकट करत असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, या उपलब्ध आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, रेल्वेमार्गे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ ही गोव्याबद्दल पर्यटकांचा वाढता विश्वास दर्शवते.

Railway
Rohan Khaunte IT Goa | पर्यटनासोबतच गोवा देशाचे क्रिएटिव्ह कॅपिटल होणार

वाढलेली रेल्वे संपर्क व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यांपलीकडे विस्तारलेले पर्यटन अनुभव आणि दर्जेदार पर्यटनावर दिला जाणारा भर यामुळे अधिकाधिक पर्यटक पुन्हा गोव्याला भेट देत आहेत.

वारसा, अध्यात्म, ग्रामीण पर्यटनाचाही विस्तार

वारसा, अध्यात्म, ग्रामीण पर्यटन, आरोग्य पर्यटन, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि मान्सून पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये पर्यटन सेवांचा विस्तार सुरू असून, यामुळे ही सकारात्मक वाढ कायम राहील, असा विश्वासही खंवटे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news