Goa Marathi Patrakar Sangh Awards | गोवा मराठी पत्रकार संघाचा पणजीत 20 जून रोजी स्थापना दिन

Goa Marathi Patrakar Sangh Awards | 'पुढारी'च्या दीपक जाधव यांच्यासह चार पत्रकारांना पुरस्कार जाहीर
Goa Marathi Patrakar Sangh Awards
Goa Marathi Patrakar Sangh Awards
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा मराठी पत्रकार संघाचा स्थापना दिन शनिवार, दि. २० जून रोजी कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ग्रामीण पत्रकार आणि संपादकीय डेस्कवर कार्यरत असलेल्या एकूण चार पत्रकारांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.

Goa Marathi Patrakar Sangh Awards
CM Pramod Sawant | स्वातंत्र्यसैनिकांच्या 22 मुलांना आज नियुक्तिपत्रे

साळगावचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन केदार नाईक यांनी त्यांचे वडील कै. जयप्रकाश नाईक यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रातील योगदान पुरस्कारासाठी यंदा डिचोलीचे विशांत वझे आणि पैंगीणचे सुभाष महाले यांची निवड करण्यात आली आहे.

तर ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या पुरस्कारासाठी संपादकीय डेस्कवर उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दै. पुढारीचे दीपक जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार नीरज प्रभू यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या पुरस्कारासाठी सूरज प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.

Goa Marathi Patrakar Sangh Awards
Maje Ghar Yojna | 'माझे घर' च्या हजार सनदांचे आज वितरण

या चारही ज्येष्ठ पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. या कार्यक्रमात जयंत संभाजी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कला अकादमीचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन तथा आमदार केदार नाईक उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news