CM Pramod Sawant | स्वातंत्र्यसैनिकांच्या 22 मुलांना आज नियुक्तिपत्रे

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आयआयटीसाठी जमीन हस्तांतरणास मंजुरी
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा मुक्तीदिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या २२ पात्र मुलांना गुरुवार, दि. १८ जून रोजी सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

CM Pramod Sawant
Goa Harit Goa Swachh Campaign | प्लास्टिक, कचरामुक्त गावांना मिळणार पुरस्कार

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत १५० हून अधिक स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे उर्वरित काही प्रकरणे प्रलंबित असून ती लवकरच निकाली काढली जातील.

मंत्रिमंडळाने मडगाव येथील नर्सिंग रुग्णालयासाठी ७३ नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच फर्मागुढी येथे आयआयटीसाठी जमीन हस्तांतरणालाही मान्यता देण्यात आली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर व्याख्याते नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

CM Pramod Sawant
Maje Ghar Yojna | 'माझे घर' च्या हजार सनदांचे आज वितरण

डॉ. प्रमोद सावंत मडगाव येथील ईएसआय वैद्यकीय महाविद्यालय अंतिम पाहणीअभावी सुरू झालेले नसून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'गोवा महामार्ग कायदा (पुनरुज्जीवन, सुधारणा व वैधता) विधेयक २०२३' केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनांनुसार तात्पुरते मागे घेण्यात आले असून आवश्यक सुधारणा करून ते पुन्हा सादर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

स्मार्ट मीटरला स्थगिती...

विजेच्या स्मार्ट मीटर प्रकल्पाला सध्या स्थगिती देण्यात आली असून वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमी लोड दाखवून जादा वीज वापरणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news