Goa Marathi Film Festival 2026 | पणजीत 7 ते 9 ऑगस्टदरम्यान गोवा मराठी चित्रपट महोत्सव

Goa Marathi Film Festival 2026 | बहुचर्चित आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे.
Goa Marathi Film Festival 2026
Goa Marathi Film Festival 2026Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. विन्सन वल्डचे प्रमुख संजय शेट्ये यांच्या पुढाकारातून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवाची मराठी चित्रपटसृष्टीसह रसिकांनाही मोठी उत्सुकता असते.

Goa Marathi Film Festival 2026
Raja Shivaji Movie: ‘तुमच्या भावना समजतात, पण...’; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची कळकळीची विनंती

दर्जेदार मराठी चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव गेल्या काही वर्षांत मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.

गोवा, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतील चित्रपटप्रेमी, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा या महोत्सवात सहभाग असतो. नव्या मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, कलाकारांशी संवाद, चर्चासत्रे तसेच चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मान सोहळे अशा विविध कार्यक्रमांमुळे महोत्सवाचे आकर्षण अधिक वाढते.

Goa Marathi Film Festival 2026
Raja Shivaji Free Screening: ‘राजा शिवाजी’ चित्रपट फ्रीमध्ये पाहता येणार; जाणून घ्या वेळ आणि ठिकाण

मराठी चित्रपटांच्या प्रचार संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही या महोत्सवातून सातत्याने केले जाते.. दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात अनेक दर्जेदार आणि आशयघन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून पाचहून अधिक चित्रपटांचे प्रीमियर या महोत्सवात पहायला मिळणार आहेत. शिवाय 'स्क्रिप्ट रायटिंग' वर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचेही आयोजकांनी 'पुढारी' शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news