

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात कार्यरत असलेले दोन वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी अजय कृष्णा वर्मा आणि राहुल गुप्ता यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने (एमएसए) जारी केलेल्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात आली आहे.
गोव्यात पोलिस उपमहानिरीक्षक असलेल्या अजय कृष्णा वर्मा यांची पोलीस महासंचालक (आयजीपी) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार देशातील अॅग्मूट कॅडरमधील एकूण १० आयपीएस अधिकाऱ्यांना आयजीपी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
दरम्यान, गोवा गुन्हे शाखेचे अधीक्षक (एसपी) असलेले राहुल गुप्ता यांची भारतीय पोलीस सेवेच्या कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी मध्ये पदोन्नती करण्यात आली आहे. ही पदोन्नती २०१७ बॅचमधील देशभरातील १४ आयपीएस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशांतर्गत करण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे गोवा पोलिस दलाच्या प्रशासनाला अधिक बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.