Goa Prostitution Case | वेश्या व्यवसायप्रकरणी आदेशाला आव्हान देणारा अर्ज फेटाळला

Goa Prostitution Case | सत्र न्यायालयाने संशयित महेंद्र साळगावकर याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी १७जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या आदेशात कोणताही दोष आढळत नाही.
municipal employee POCSO case
पालिकेतील पोस्को गुन्ह्यातील कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

एका तपापूर्वी म्हापसा येथील एका इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी अटक केलेल्या उसकई (बार्देश) येथील महेंद्र साळगावकर याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला आव्हान दिलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला.

municipal employee POCSO case
Goa Tourism Minister Rohan Khaunte | 'गोव्यात काहीही चालते' ही मानसिकता बदला! पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांना सुनावले

सत्र न्यायालयाने संशयित महेंद्र साळगावकर याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी १७जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या आदेशात कोणताही दोष आढळत नाही. आरोपपत्रात संशयिताविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी प्रथमदर्शनी पुरावे आहेत. त्यामुळे या आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता दिसत नाही असे निरीक्षण गोवा खंडपीठाने नोंदवले आहे.

रायबंदर येथील क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीच्या आधारे ९ ऑगस्ट २०१४ रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास म्हापसा येथील वेनस अँड मार्स सलून स्पा बॉडी केअर पहिल्या मजल्यावर असलेल्या इमारतीत छापा टाकला होता.

या कारवाईवेळी तेथे कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास लावून संशयित त्यांच्या कमाईवर आपला उदरनिर्वाह करत होते. बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई करण्यात आली होती.

कारवाईवेळी चार खोल्यांमध्ये ग्राहकांसोबत चार तरुणी होत्या. मसाजच्या नावाखाली तेथे देहविक्री सुरू असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले होते. त्यावेळी संशयित महेंद्र साळगावकर उपस्थित होता.

municipal employee POCSO case
Vijay Sardesai Apology | विजय सरदेसाईंनी सभागृहात मागितली बिनशर्त माफी! मिराबाग आंदोलन प्रकरणावर दिली महत्त्वाची कबुली

पोलिसांनी पाठवलेल्या बोगस ग्राहकाने दिलेल्या रक्कमेच्या नोटा नोंद करून ठेवण्यात आल्या होत्या. संशयिताने या नोटा घेऊन त्याला एका खोलीत तरुणीसोबत संशयिताने पाठवले होते. पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या संशयित महेंद्र साळगावकर याच्यासह इतर दलालांना अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता त्याला साळगावकर याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news