Chimbel Illegal Borewells |"चिंबल मधील बेकायदेशीर बोअरवेल्स मालकांना 5 लाखांपर्यंत दंड करा!; मुंबई उच्च न्यायालयाचे भूजल अधिकाऱ्यांना कडक निर्देश"

Chimbel Illegal Borewells | जलस्रोत खात्याने आतापर्यंत चिंबल मधील बेकायदेशीर ४३ बोअरवेल्स सील केल्या आहेत.
Goa Illegal Borewell
Goa Illegal Borewell
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जलस्रोत खात्याने आतापर्यंत चिंबल मधील बेकायदेशीर ४३ बोअरवेल्स सील केल्या आहेत. या सील केलेल्या बोअरवेल्सच्या मालकांना कायद्यानुसार ५ लाखांपर्यंत दंड ठोठावण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भूजल अधिकाऱ्यांना दिले.

Goa Illegal Borewell
Mumbai Water Crisis: तहान लागली अन् पालिका बोअरवेल खोदण्यास निघाली

या कारवाईचा सविस्तर अहवाल ६ आठवड्यात सादर करण्यास सांगितला आहे. चिंबल येथील बेकायदेशीर ४३ बोअरवेल्सच्या बांधकामास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती किंवा रहिवाशांविरोधात कठोर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिल्याने खळबळ माजली आहे.

Goa Illegal Borewell
Goa Illegal Borewells | ऑगस्टपासून बेकायदा बोअरवेल्सवर कारवाई

बोअरवेल्स मालकांची माहिती उपलब्ध नसल्यास ती चिंबल पंचायतीकडून घेण्याचे भूजल अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या तपासात आणि कारवाईत मदत करण्यासाठी संशयितांच्या वास्तव्याची आणि घरांची हिती (माहिती) सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news