Goa Government Jobs | सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा! अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचे आरक्षण 5 वरून 10 टक्के

Goa Government Jobs | कामावर असताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पूर्वी फक्त ५ टक्के नोकऱ्या राखीव होत्या. आपल्या सरकारने त्या 10 टक्के केल्या.
Goa Government Schemes
Goa Government Schemes (Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कामावर असताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पूर्वी फक्त ५ टक्के नोकऱ्या राखीव होत्या. आपल्या सरकारने त्या १० टक्के केल्या. पूर्वी तीन लाखांपर्यंत उत्पन्न मर्यादा होती तीही आपल्या सरकारने वाढवलेली आहे.

Goa Government Schemes
Goa Tourism Minister Rohan Khaunte | 'गोव्यात काहीही चालते' ही मानसिकता बदला! पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांना सुनावले

पालक नसलेल्या मुलांना लगेच नोकरी देण्यासाठी सरकारने नियमात सुधारणा केली आहे. सध्या प्रतीक्षेत असलेल्या ५७ जणांना लवकरच नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

शून्य प्रहाराला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून आपल्या मतदार संघातील एका सरकारी नोकराचा मृत्यू होऊन आठ वर्षे झाली, तरी त्याच्या वारसाला नोकरी मिळाली नसल्याचा दावा केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, टप्प्याटप्प्याने सगळ्यांना नियमानुसार नोकरीत सामावून घेतले जात आहे.

Goa Government Schemes
Vijay Sardesai Apology | विजय सरदेसाईंनी सभागृहात मागितली बिनशर्त माफी! मिराबाग आंदोलन प्रकरणावर दिली महत्त्वाची कबुली

स्वतंत्र्य सैनिकांच्या मुलांना गेली साठ वर्षे नोकरी देणे काँग्रेस सरकारला जमले नव्हते, त्या सर्वांना आमच्या सरकारने नोकऱ्या दिल्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शून्य प्रहराला वेंझी विएगस यांनी खलाशांची समिती स्थापून त्यांना मदत करण्याची मागणी केली.

आएचएन घरांना क्रमांक देणार

शून्य प्रहराला आमदार डिलायला लोबो यांनी शिवोली मतदारसंघातील अनेक घरांना तात्पुरते क्रमांक (आयएचएन) दिले आहेत. मात्र, त्यांना वीज आणि पाणी कनेक्शन दिले नसल्याचे सांगितले. त्यावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पात अशा घरांना वीज आणि पाणी जोडणी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार वीज जोडणी दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news