GCZMA | झुआरी टॉवर्स प्रकल्पाला जीसीझेडएमएची विविध अटींसह मंजुरी

Goa Coastal Zone Management Authority (GCZMA) -झुआरी टॉवर्स प्रकल्पाला जीसीझेडएमएची विविध अटींसह मंजुरी
GCZMA
GCZMA
Published on
Updated on

पणजी : झुआरीवरील जुळ्या पुलांच्या मधोमध पर्यटन पायाभूत सुविधांना मोठा चालना देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या टॉवर्सला गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) विविध अटीसह मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ पणजी मंगळूरू विभागावरील नवीन जुवारी पुलामध्ये वेधशाळा मनोरे आणि व्ह्यूइंग गॅलरी, तसेच पुलाकडे जाणारे मार्ग, सजावटीची रोषणाई आणि पार्किंग सुविधा यांच्या बांधकामाचा प्रस्ताव गोवा राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाकडे शिफारस करण्याचा ठराव केला आहे.

GCZMA
Goa Police Promotions 2026 | 'त्या' सहाजणांना पोलिस निरीक्षक पद बहाल

सार्वजनिक बांधकाम खात्याने मे. झुआरी ऑब्झव्हेंटरी टॉवर्स लिमिटेड मार्फत प्रस्तावित केलेल्या या प्रकल्पांतर्गत दोन टॉवर्स उभारण्याची योजना आहे. कुठ्ठाळीच्या बाजूला पाइल पी-७३ वरील टॉवर टी आणि आगशीच्या बाजूला पाइल पी-७२ वरील टॉवर टी. हे दोन्ही टॉवर्स केबल-स्टेड झुआरी पुलाच्या सध्याच्या पाइल कॅप्सवर बांधले जातील आणि १२० मीटर लांब व १२ मीटर रुंद पादचारी मागनि आपापल्या काठांना जोडले जातील.

GCZMA
Goa Row Gautam Khattar | गौतम खट्टरसह आयोजकांनाही तत्काळ अटक करा

जीसीझेडएमएतर्फे घालण्यात आलेल्या प्रमुख अटीमध्ये लोर स्पेस इंडेक्स ०.३३ पेक्षा जास्त नसावा, पायाच्या एकूण बांधकामाची उंची ९ मीटरपेक्षा जास्त नसावी आणि खारफुटीची कोणतीही तोड केली जाणार नाही. प्रकल्पामुळे मच्छीमार समुदायाचे विस्थापन होता कामा नये किंवा भरती-ओहोटीच्या प्रवाहात अडथळा येता कामा नये, फ्लोअर स्पेस इंडेक्स वाढवला जाणार नाही, आणि एक समर्पित पर्यावरण व्यवस्थापन कक्ष असणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news