Goa Row Gautam Khattar | गौतम खट्टरसह आयोजकांनाही तत्काळ अटक करा

Gautam Khattar Arrest Demand Goa-सेंट फ्रान्सिस झेवियरवरील आक्षेपार्ह विधानप्रकरणी वास्कोत जनक्षोभ
Goa Row Gautam Khattar
वास्को पोलिस स्थानकासमोर जमलेले मोर्चेकरी तसेच तैनात पोलिस.
Published on
Updated on

वास्को : सेंट फ्रान्सिस झेवियर आक्षेपार्ह विधान करणारा गौतम खट्टर अद्याप हाती न लागल्याने येथील ख्रिश्चन बांधवांनी गुरुवारी (दि. २३) सकाळी मोर्चा काढून वास्को पोलिसांना जाब विचारला. तसेच खट्टर याला प्रमुख वक्ते म्हणून पाचारण करणाऱ्या आयोजन समितीविरोधात कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला, याप्रकरणी वास्कोचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी या प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग केल्याने आता आमची भूमिका फक्त सहायकांची असल्याचे सांगितले. तथापि, सुमारे अडीच-तीन तास तेथे संबंधित मोर्चेकरयांनी ठाण मांडले होते.

Goa Row Gautam Khattar
Goa crime |पार्सेतील प्रवेशबंदीच्या अटीवर दुहेरी खून प्रकरणातील झाटेला जामीन

मोर्चकरांनी आपल्या मागणीच्या निवनेदनावर सह्या करून ते पोलिसांना दिले. येथील ख्रिश्चन बांधवांनी खट्टर विरोधात विविध घोषणांचे फलक घेऊन एफ. एल. गोम्स मागनि मोर्चा काडला. वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा आल्यावर तेथे त्यांना स्थानकाबाहेर अडविण्यात आले. पावेळेस तेथे मोठा पोलिसबंदोबस्त होता. तसेच मुरगावचे उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, वास्कोचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, काणकोणचे उपअधीक्षक नीलेश राणे, वास्कोचे निरीक्षक वैभव नाईक, वेर्णाचे निरीक्षक आनंद शिरोडकर, बास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक अमरनाथ पासी, मुरगावचे शेरीफ जॅकीस तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मोर्चेकरीचे नेतृत्व करणारयांनी पोलिस अधिकाऱ्यांना निरनिराळे प्रश्न विचारून आपल्या संतापाला बाट करून दिली.

यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांना अटक का केली नाही, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमदारांना अटक का केली नाही. आयोजकांना अटक का केली नाही, हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे का सोपविण्यात आले, असे विविध प्रश्नांचा भडिमार ते सतत करीत राहिले. आम्ही आतापर्यंत शांततेने मोर्चा काढीत आहोत. काही होत नसेल तर आम्हाला पुढील मागनि जावे लागेल, असा इशाराही कोणी देऊ लागला.

Goa Row Gautam Khattar
Mumbai-Goa highway | पर्वरीतील रस्ता २० मेपर्यंत बंद राहणार

याप्रसंगी माजी मंत्री जुझे फिलिप डिसौझा, माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नझीर खान, माजी नगराध्यक्ष, लविना डिसोझा, ख्रिस्तिनोओ डिसोझा, रामा काणकोणकर, फिदोल परेरा, शंकर पोळजी, सांतान कुरेय्या, रांनी डिसोझा, शहीद शेख, माजी नगरसेवक नीलेश नावेलकर, पंच रोमन बाझ, काँग्रेस नेत पीटर डिसौझा, सुनील नाईक, फादर मारियन, फिलोमिना डिसीझा वगैरे उपस्थित होते. अधीक्षक गुरुदास कदम, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, उपअधीक्षक नीलेश राणे, मामलेदार प्रविणजय पंडित यांनी मोर्चेकरयांच्या दोन-चार नेत्यांना आत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. बराच वेळ चर्चा सुरू होती.

यादरम्यान काँग्रेस खासदार विरिएतो फर्नाडिस तेथे पोहचले. त्यांनी मंत्री गुदिन्हो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज व्यक्त केली आहे. खट्टरच्या भावाला अटक केली, हे फक्त लोकांना दाखविण्यासाठी आहे. खट्टर यांच्याबद्दल सर्व माहिती मिळविण्यासाठी आयोजकाकडून माहिती घेतली पाहिने होती. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळविल्या आहेत काय, असाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news