

पणजी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील राज्यातील पर्वरी येथील ५०८.००० किमी ते ५१३.१५० किमी पर्यंतच्या सहा पदरी उन्नत मार्गाचे (अॅप्रोचेससह) बांधकाम कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी, विद्यमान राष्ट्रीय महामार्ग ६६ ची उजवी बाजू ए २ च्या अॅप्रोच रोडपासून (नियो मॅजेस्टिक हॉटेल, पर्वरीजवळ) पासून गौरी पेट्रोल पंप, पर्वरी पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०२६ (मध्यरात्री) ते बुधवार, दि.२० मे २०२६ पर्यंत बंद राहील, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला