Goa crime |पार्सेतील प्रवेशबंदीच्या अटीवर दुहेरी खून प्रकरणातील झाटेला जामीन

पार्सेतील प्रवेशबंदीच्या अटीवर दुहेरी खूनप्रकरणातील झाटेला जामीन
bail
bail file photo
Published on
Updated on

पणजी : पेडणे तालुक्यातील वायडोंगर पार्से येथील दुहेरी खूनप्रकरणातील संशयित अनिल अंबादा झाटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पार्से गावात प्रवेशबंदीची अट घालून सशर्त जामीन दिला.

bail
Milk Price Hike |राज्यातील दूध उत्पादकांसाठी 'अच्छे दिन', दरवाढ जाहीर

या प्रकरणात प्रथमदर्शनी संशयिताची भूमिका स्पष्ट होत नाही व खटल्यावरील सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याने जामीन देण्यात येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले. संशयित झाटे हा चार वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. खटल्यातील दोन साक्षीदारांची साक्ष नोंद झाली असून तिसरा साक्षीदार सध्या जबानीसाठी न्यायालयाच्या पिंजऱ्यात आहे.

ही सुनावणी पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. यापूर्वी त्याने दोनवेळा जामिनासाठी सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता तो फेटाळण्यात आला. हा खटला स्थितीजनक पुराव्याच्या आधारावर सुरू आहे. या खुनाशी संशयिताचा संबंध असल्याचा पुरावा दिसत नाही. न्यायवैद्यक अहवाल अजूनही येणे बाकी आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात हा अर्ज केला आहे. खटल्यावरील सुनावणीचा वेग पाहता संशयिताला तुरुंगात ठेवणे योग्य दिस नाही असे निरीक्षण खंडपीठाने आदेशात केले आहे.

bail
Goa Government Jobs 2026 |निवड आयोगामार्फत २,५०० पदे भरणार!

संशयित झाटे हा स्वतःच्या पत्नीसह रेजिनाल्ड दाम्पत्याकडे कामाला होता. २०१३ साली अनिल झाटे याने रेजिनाल्डच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी रेजिनाल्ड याने पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यामुळे झाटे याला अटक होऊन शिक्षा झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news