Goa Wildlife | वन्यजीवांसाठी लवकरच पहिले समर्पित उपचार केंद्र

Goa Wildlife | प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता; २४ तास रुग्णवाहिका सेवा सुरू होणार
Water Hole Wildlife Census
१९८०पासून पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत सुरू झाली आहे. (Canva Photo)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील वन्य प्राण्यांसाठी पहिले समर्पित संक्रमणकालीन उपचार केंद्र तसेच २४ तास वन्यजीव रुग्णवाहिका आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली उभारण्यात येणार असल्याची माहिती वन खात्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांनी दिली. सध्या नियोजन आणि प्रारंभिक अंमलबजावणीच्या टप्प्यात असलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश राज्यभरातील जखमी, आजारी आणि विस्थापित वन्यजीवांच्या बचाव, उपचार व पुनर्वसन व्यवस्थेत सुधारणा करणे हा आहे.

Water Hole Wildlife Census
Vasai Virar Health Department: वसई-विरार महानगरपालिकेतील डॉक्टरांकडून नियमांचे उल्लंघन

महाराष्ट्रातील यशस्वी पशुवैद्यकीय आपत्कालीन सेवांचा अभ्यास करून या प्रकल्पाची संकल्पना विकसित करण्यात आली असल्याचे दत्ता यांनी सांगितले. या अंतर्गत फोंडा तालुक्यातील बेतोडा येथे अत्याधुनिक सुविधा असलेले कायमस्वरूपी वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात शस्त्रक्रिया सुविधा असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय, सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष, विषाणूजन्य व जिवाणूजन्य संसर्ग तपासण्यासाठी निदान प्रयोगशाळा, निरीक्षण व विलगीकरणासाठी विशेष पिंजरे तसेच आपत्कालीन स्थिरीकरण विभाग असणार आहे.

या प्रकल्पासाठी पुणे आणि नाशिक येथे कॉर्पोरेट अनुदानित पशुवैद्यकीय रुग्णालये चालविणाऱ्या 'रेस्क्यू वाइल्डलाइफ ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. गोवा सरकारचे वन खाते आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असून स्वयंसेवी संस्था प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणार आहे.

वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अशा प्रकल्पांना भेट देऊन त्यांची कार्यपद्धती, कर्मचारी रचना आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचा अभ्यास केल्याचे दत्ता यांनी सांगितले. बेतोडा येथील केंद्रासाठी राज्याच्या मध्यवर्ती स्थानाची निवड करण्यात आली असून त्यामुळे राज्यभरात जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

हे केंद्र वन्यजीव रुग्णालयाबरोबरच्च तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राचेही कार्य करेल बेतोडा येथील कायमस्वरूपी केंद्राचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पणजी येथील एक नूतनीकरण केलेल्या शासकीय इमारतीत तात्पुरते संक्रमणकालीन वन्यजीव उपचान केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र अंतरिम वन्यजीव आपत्कालीन सुविधा म्हणून कार्यरत राहील.

Water Hole Wildlife Census
Maharashtra Hospital Rules: आपत्कालीन परिस्थितीत उपचार नाकारणे पडणार महागात, रुग्णालयासाठी राज्य सरकारची नवी नियमावली

बेतोडा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही सेवा तेथे स्थलांतरित करण्यात येईल. या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून गोव्यात प्रथमच विशेष वन्यजीव रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिका जखम वन्यजीवांना घटनास्थळी प्रथमोपचार देणे २४ तास आपत्कालीन प्रतिसाद देणे तसेच्च बचाव आणि पुनर्वसन प्रक्रियेस सहाय्य करणार आहेत.

जखमी वन्यजीवांमधील बचावादरम्यान होणारा मृत्यूदर कमी करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या घटनास्थळी उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्राणी वाहतुकीदरम्यान दगावतात. त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करून ही उणीव दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- कमल दत्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news