

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीत रविवारी इसवण १२०० रु. किलो होता. पापलेट १,२०० ते १,५०० रु. किलो मिळत होते. सध्या नाताळ आणि थर्टीफर्स्टसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असल्याने मासळीला मागणी वाढली आहे.
त्यामुळे मासळीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागच्या महिन्यात इसवण मोठ्या प्रमाणात मिळाल्याने त्यांचा दर ४५० रु. किलो इतका कमी झाला होता. आता दर तिप्पट झाला आहे. मासळी बाजारात मोठा बांगडे २०० रु. किलो तर छोटे १५० रु. किलो दराने मिळत आहेत. शिणाणे ५५० रु. किलो व २०० रुपयांना ६, तर तिसरे ५०० रु. १०० मिळत होते. कालवा २०० रुपये वाटा होता.
१ मोडसो ४, ५०० रुपये किलो, मोठी पापलेट १२०० ते १,५०० रुपये किलोने मिळत होती. मासळी दर इसवण १२०० रु. किलो, पापलेट मोठा १,२०० ते १,५०० रु. किलो, सरंगा मध्यम ८०० रु. किलो, मोठा १००० १२०० रु. किलो, ५०० रु. किलो, बांगडे २०० रु. किलो, तारले २०० किलो, माणके लहान १०० ते २०० रू., मोठे ३०० ५०० रु. किलो, दोडया १०० २०० रु.वाटा, लेप २०० रु. वाटा, कर्ली १५०-२५० रु. नग, तारले १०० रु. वाटा