Goa Electricity News | वीज मीटर बदलण्याची मुदत वाढवली

Goa Electricity News | मंत्री सुदिन ढवळीकर : ४० हजार घरांमध्ये मीटर आतील भागात
वीज मीटर
वीज मीटर
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील वीज मीटर २८ नोव्हेंबरपर्यंत बाहेरील भागात लावण्याचे व तसे न केल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा वीज खात्याने दिला होता. मात्र आता वीज खात्याने वीज मीटर स्थलांतराची मुदत जानेवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे.

वीज मीटर
Ponda Subhash Shirodkar | खेळात यशासाठी आहार-विहार महत्त्वाचा : मंत्री सुभाष शिरोडकर

वीज मीटर कनेक्शन तोडण्याचे काम स्थगीत केले आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. मंत्री ढवळीकर म्हणाले, ख्रिसमस हंगाम आणि वर्षअखेरीसचे उत्सव असल्याने, नियमांचे पालन न केल्यामुळे आतापर्यंत कोणताही वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही.

वीज खात्याने वर्षभरात १२ नोटिसा बजावल्या आहेत. राज्यात सुमारे ७.६ लाख वीज ग्राहक आहेत, ज्यापैकी सुमारे पाच टक्के घरांमध्ये असे मीटर आहेत जे बिल करणे किंवा मीटर रीडरला पाहणे कठीण होतात. सुमारे ४० हजार घरांमध्ये मीटर इमारतीच्या आत बसवलेले आणि प्रवेश करणे कठीण असलेले आढळले आहेत.

वीज मीटर
Bangladeshi Woman Arrested | गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला अटकेत

परदेशात राहणाऱ्या ग्राहकांना मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत घेण्यास सांगण्यात आले होते, तर इतरांना पॅनेल केलेल्या विद्युत कंत्राटदारांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला होता.

स्मार्ट मीटर बसविणेही लांबणीवर...

नोटीसमध्ये ग्राहकांना सहज पोहोचता येतील आणि हवामानापासून संरक्षित असतील अशी ठिकाणे ओळखण्यास सांगण्यात आले होते. मीटर शिफ्टिंगची अंतिम मुदत वाढवण्याव्यतिरिक्त, डिसेंबरमध्ये राज्यात स्मार्ट मीटर सुरू करण्याचा प्रकल्प देखील लांबणीवर पडला आहे, असे असे ढवळीकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news