South Goa Crime Report | दक्षिण गोव्यात अकरा महिन्यांत 13 खून

South Goa Crime Report | ३८ बलात्काराच्या घटना : विविध ७८८ गुन्ह्यांची नोंद; ६७२ गुन्ह्यांचा तपास
Goa Crime News
Goa news(File Photo)
Published on
Updated on

मडगाव : रविना कुरतरकर

दक्षिण गोवा पोलिसांत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ७८८ गुन्हे दाखल केले आहेत. यातील ६७२ गुन्ह्यांचा तपास लावला, तपासाचे हे प्रमाण ८५.२८ टक्के असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यात दोन टक्क्यांनी घट आहे. १

Goa Crime News
Ponda Subhash Shirodkar | खेळात यशासाठी आहार-विहार महत्त्वाचा : मंत्री सुभाष शिरोडकर

३ खून, ३८ बलात्कार यासह ६७गंभीर गुन्ह्यांपैकी ६४ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला असून हे प्रमाण ९५.५२ टक्के आहे. घरफोड्या, वाहन चोऱ्या व अन्य प्रकारचा चोऱ्यांचा तपास लावण्याचे प्रमाण ६१.८७ टक्के एवढे आहे.

दक्षिण गोव्यात वरील कालावधीत १३ खून, १० खुनाचा प्रयत्न, ४ सदोष मनुष्यवधाचा, दरोड्याची ३ तर ३८ बलात्कारांची मिळून ६७ गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यातील तीन बलात्कार प्रकरणे वगळता इतर गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले.

५ चोऱ्या, भरदिवसा १६ चोऱ्या, रात्रीच्या वेळी ४४ चोऱ्या, घरफोडी १५, वाहन चोऱ्या ४१, सोनसाखळी हिसवणे ८ तर मोबाईल व अन्य प्रकारच्या ३१ चोऱ्या ३८ मिळून वरील कालावधीत १६० चोऱ्यांची नोंद झाली आहे.

यातील ९९ चोऱ्यांचा तपास लावण्यात आला, या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे तपासाची टक्केवारी कमी झाली आहे. वरील कालावधीत फसवणुकीचे ५८ गुन्हे दाखल झाले असून ४९ गुन्हांचा तपास लागला. विश्वासघात केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९ गुन्ह्यांचा तपास लावला आहे.

गोंधळ घालण्याचे १३ प्रकार घडले व सर्व प्रकारात दोर्षीवर कारवाई झाली. मारहाणीत जखमी करण्याचे ६६ गुन्हे दाखल असून ६४ प्रकरणांत संशयितांवर कारवाई झाली. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांनुसार १३४ प्रकरणांची नोंद असून, त्यातील १०९ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे.

गस्त वाढवली...

दक्षिण गोवा पोलिसांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि पोलिस स्थानकाच्या वाहनांची तसेच स्थानिक गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली आहे. या व्यतिरिक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची वेळोवेळी चौकशी करण्यात येत आहे. तसेच भाडेकरूंची तपासणी करण्यासोबत संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी आली आहे.

Goa Crime News
Bangladeshi Woman Arrested | गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारी बांगलादेशी महिला अटकेत

दरोड्यातील संशयित जेरबंद

दक्षिण गोव्यात मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत लैंगिक अत्याचाराची ३८ प्रकरणे नोंद असून, त्यातील ३५ प्रकरणातील संशयितांवर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ३७ प्रकरणे घडलेली होती.

यावर्षी दरोड्याची तीन प्रकरणे घडली असून, तिन्ही प्रकरणांत संशयितांना गजाआड करण्यात आले. तसेच अपहरणाची ३१ प्रकरणे घडली असून, त्यातील २८ प्रकरणात संशयितांवर कारवाई झाली. गेल्यावर्षपिक्षा अपहरणांच्या प्रकरणांत कमी आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news