Goa Fire Services Poster Competition | अग्निशमनच्या पोस्टर स्पर्धेत 1307 विद्यार्थ्यांचा सहभाग

दोन गटांत स्पर्धा; अनुक्रमे ५६५,७४२ स्पर्धकांनी केले सर्जनशील सादरीकरण
Goa Fire Services Poster Competition
Goa Fire Services Poster Competition
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी अग्रिशमन संचालनालयामार्फत राज्यभरात एका पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या वयोगटांतील १३०७शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढवणे, त्यांना आग प्रतिबंध आणि आपत्कालीन तयारीच्या महत्त्वाच्या पैलूंबद्दल संवेदनशील करणे हा होता.

Goa Fire Services Poster Competition
Agriculture Land Issues | पैशांच्या लोभापायी शेती नष्ट

गट १ (७-१० वर्षे) मधील विद्यार्थ्यांनी 'थांबा, खाली बसा आणि लोळा आगीपासून सुरक्षित राहा' या संकल्पनेखाली सहभाग घेतला. सहभागींनी त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे, आगीची एक उपयुक्त संसाधन आणि संभाव्य धोका अशी दुहेरी भूमिका प्रभावीपणे दर्शवली.

या कलाकृतींमधून अग्निसुरक्षेच्या पद्धतींची समज, तसेच त्याचे फायदे आणि धोके यांचे कल्पनात्मक सादरीकरण दिसून आले. गट २ (११-१४ वर्षे) मधील सहभागींनी 'सुरक्षित समाजासाठी अग्निसुरक्षा जागरूकता' या संकल्पनेवर काम केले. ल्या.

या कलाकृतींमधून प्रतिबंधात्मक उपाय, आपत्कालीन प्रतिसाद आणि समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यातील व्यक्तींच्या भूमिकेबद्दल जागरूकता दर्शविली गेली. विद्यार्थ्यांनी अग्निसुरक्षा नियमावली आणि तयारीची प्रशंसनीय समज दाखवली. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना कलात्मक प्रतिभा दाखवण्यासाठी केवळ एक व्यासपीठच उपलब्ध करून दिले नाही, तर अग्निसुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे जीवनरक्षक संदेशही दृढ केले.

Goa Fire Services Poster Competition
Ponda By-election Goa 2026 | फोंड्यातील वातावरण गरमागरम; प्रचार शिगेला

गट निहाय विद्यार्थी संख्या

राज्यभरातील विविध अग्रिशमन केंद्रांकडून या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी १३०७ प्रवेशिका सादर करण्यात आल्या. गट १ मध्ये २५० मुले आणि ३१५ मुली मिळून एकूण ५६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गट २ मध्ये ३१३ मुले आणि ४२९ मुली मिळून ७४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी केंद्रांत जुने गोवे अग्रिशमन केंद्राने २६१ प्रवेशिका नोंदवल्या, त्याखालोखाल मडगाव अग्रिशमन केंद्राने १७७ प्रवेशिका सादर केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news