Ponda By-election Goa 2026 | फोंड्यातील वातावरण गरमागरम; प्रचार शिगेला

Ponda By-election Goa 2026 | अनेक राजकीय पदाधिकारी शहरात डेरा टाकून; भाजपसह काँग्रेस, आपची कसोटी
election news
election newsFile Photo
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

फोंडा पोटनिवडणुकीतील वातावरण बरेच तापले आहे. प्रचाराचा घुरळा फोंडा पालिकेसह कुर्टी खांडेपार पंचायतक्षेत्रात उडाला असून दोन दिवसांनी प्रचार संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी सत्ताधारी भाजप पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून प्रचारावर जोर देताना मतदारसंघ पिंजून काढण्यात आला आहे.

election news
Omkar Elephant | पेडणेकरांची झोप उडाली! 'ओंकार' हत्तीचे मोप परिसरात पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सध्या तर फोंड्यातच डेरा टाकून आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी काँग्रेस आणि आपची खरी कसोटी आहे. फोडा मतदारसंघातील २७ हजार ९२७ मतदारांच्या हातात या तिन्ही राजकीय पक्षांचे भवितव्य असून कोण बाजी मारतो ते पाहावे लागेल मात्र सध्या तरी खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेस पक्षातच.

विशेष म्हणजे मुस्लीम आणि ख्रिश्चन मते निर्णायक ठरतील, असे सध्या तरी वातावरण आहे. फोंड्याचे दिवंगत आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर प्रथमच त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक होत आहे. त्यामुळे साहजिकच रवी नाईक यांनी फॉड्यात केलेला विकास याचे मोजमाप मतदारांच्या हाती आहे.

रवी नाईक यांचा अजूनही प्रभाव रवी नाईक यांच्या जागी भाजपाने त्यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. रवी नाईक यांचा प्रभाव या निवडणुकीवर पडणार आहे हे निश्चित त्यामुळे एकापरीने रितेश नाईक यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. वडिलांनी साधलेला फोंड्याचा विकास आणि केलेली कामे रितेश नाईक यांच्यासाठी प्लस पॉइंट ठरणार आहे.

रितेश नाईक यांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक कार्यकाळातील झालेली कामे घेक्लेले धोरणात्मक निर्णय तसेच सीएसआर निधीखाली विविध कंपन्यांकडून केलेली कामे ही जमेची बाजू ठरणार आहे. शिवाय मागच्या कोविड काळात कुठेही गाजावजा न करता केलेले काम पण रितेशसाठी उपयुक्त ठरेल असा दावा करण्यात येत आहे.

डॉ. केतन भाटीकर यांचा संपर्क महत्त्वाचा

काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचा संपर्क जबरदस्त आहे, विविध समाजोपयोगी उपक्रम त्याचबरोबर वैद्यकीय शिबिरे हे केतन भाटीकर यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे. रायझिंग फोंडा या संघटनेच्या माध्यमातून भाटीकर यांनी समाजसेवी उपक्रम राबवलेत.

त्यामुळे साहजिकच त्यांचा प्रभाव राहील. फक्त एकच गोष्ट भाटीकर यांच्यासाठी मायनस ठरू शकते ती म्हणजे या निवडणुकीत मगो पक्षाचा जाहीर पाठिंचा मिळणार नाही तरीपण मगोतील काही फुटीरांचा छुपा पाठिंबा मिळेल असा दावा करण्यात येत आहे.

election news
Agriculture Land Issues | पैशांच्या लोभापायी शेती नष्ट

मुख्यमंत्र्यांचा फोड्यात डेरा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सध्या फोंड्यात डेरा आहे. ही पोटनिवडणूक सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. रितेश नाईक यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फोंड्यातील भाजपचे एक कार्यकर्ते विश्वनाथ दळवी यांनी केलेला थयथयाट आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या विरोधामुळे भाजपसाठी एक पाऊल मागे अशी परिस्थिती आहे.

मागाहून सगळ काही आलबेल झाले आणि विश्वनाथ दळवी यांनी रितेश नाईक यांना पाठिंबा जाहीर केला तरी कुठेही गाहारी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री सध्या या मतदारसंघाचा स्वतः आढावा घेत आहेत लोकांच्या विविध संघटनांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्याशी मतदारांशी संवाद साचत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news