Goa Excise Department | गोव्यात मद्यविक्रीवर 'डिजिटल' वॉच! आता प्रत्येक बाटलीचा मागोवा घेणार 'ट्रॅक-अँड-ट्रेस' सॉफ्टवेअर

Goa Excise Department | पारदर्शकतेसाठी होणार सॉफ्टवेअरचा वापर
alcohol संग्रहित फोटो
alcohol संग्रहित फोटो
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उत्पादन शुल्क खात्याने राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक मद्यपेयाचा मागोवा घेणाऱ्या ट्रॅक-अँड-ट्रेस सॉफ्टवे-अरचा वापर करण्याची योजना आखली आहे. त्याद्वारे मद्य व्यावसायिकांवर देखरेख ठेवली जाणार आहे. प्रत्येक उत्पादनाची ओळख आणि प्रमाणीकरण करण्यासाठी दारूच्या सर्व बाटल्यांवर विशेष लेबल लावले जाणार आहे.

alcohol संग्रहित फोटो
Girish Mahajan Nashik | पुण्यापेक्षाही आता नाशिकला पहिली पसंती! विकासाच्या ओढीमुळे नाशिक बनले गुंतवणुकीचे केंद्र

प्रस्तावित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महसुलातील गळती रोखणे, तसेच उत्पादनाच्या संपूर्ण वाहतुकी विषयी माहिती गोळा करणे, हे विभागाचे उद्दिष्ट आहे. ट्रॅक-अँड-ट्रेस सॉफ्टवे अरचा दुसरा फायदा म्हणजे बाजारातील बनावट किंवा शुल्क न भरलेल्या दारूचा शोध घेणे असल्याचे गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमार्फत उत्पादन शुल्क खात्याने जारी केलेल्या निविदा दस्तऐवजात म्हटले आहे.

दस्तऐवजानुसार, मद्यपेयांचे उत्पादन, आयात, वाहतूक, साठवणूक, वितरण आणि विक्री यांचे नियमन व देखरेख करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क खात्याची आहे. महसूल मिळवण्याचे प्रमुख साधन म्हणून, उत्पादन शुल्क कायद्यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे, अवैध व्यापाराला प्रतिबंध करणे आणि प्रभावी नियामक यंत्रणा व अंमलबजावणीद्वारे महसुलाचे संरक्षण करणे, ही या खात्याची जबाबदारी आहे.

alcohol संग्रहित फोटो
Dhule Shivsena Protest | देवाधर्माच्या आडून होणाऱ्या बेकायदेशीर कामांना ठाम विरोध; ठाकरे गटाचा इशारा

सध्या दारू उद्योगावर प्रशासकीय प्रक्रिया आणि गोवा उत्पादन शुल्क व्यवस्थापन प्रणाली यांसारख्या डिजिटल प्रणालींच्या संयोजनाद्वारे देखरेख ठेवली जाते. उत्पादन किंवा आयातीपासून ते अंतिम विक्रीच्या ठिकाणापर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये बाटली-स्त-रावरील दारूच्या बाटल्यांची रिअल-टाइम दृश्यमानता यांमध्ये एक मोठी उणीव आहे. ही उणीव या नव्या उपक्र-माद्वारे भरुन काढली जाईल.

उत्पादन शुल्क व्यवस्थापनाशी थेट जोडणी...

हे सॉफ्टवेअर उत्पादन शुल्क व्यवस्थापन प्रणालीशी जोडले जाईल. ही निविदा राज्यातील दारूच्या बाटल्यांसाठी २ कोड-आधारित ट्रॅक अँड ट्रेस प्रणालीची रचना, विकास, अंमलबजावणी, संचालन आणि देखभाल, तसेच होलोग्राम सीलची सुरक्षित छपाई आणि पुरवठा यासाठी एजन्सीच्या निवडीकरिता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news