Goa Domestic LPG Cylinder Price Hike | घरगुती सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ

Goa Domestic LPG Cylinder Price Hike | सर्वसामान्य मेटाकुटीला; गृहिणींमध्ये कमालीची नाराजी
LPG Cylinder Price
LPG Cylinder Pricefile photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

व्यावसायिक सिलिडरनंतर आता घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, ७ जूनपासून नवीन दर लागू झाले आहेत. नव्या दरानुसार घरगुती एलपीजीची किंमत ९५६ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

LPG Cylinder Price
LPG Cylinder Price Hike | हॉटेल व्यावसायिक अडचणीत! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

यापूर्वी हा दर ९२७ रुपये होता. त्यामुळे ग्राहकांवर प्रति सिलिंडर २९ रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून यामुळे राज्यातील गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे. गॅस वितरण कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ७ जूनपूर्वी सिलिंडरची नोंदणी (बुकिंग) केली असली तरी ७ जून किंवा त्यानंतर जारी होणाऱ्या बिलांवर नवीन दरानुसार ९५६ रुपये आकारले जाणार आहेत.

महागाईमुळे महिलांवर आर्थिक ताण : युरी

सरकार केवळ 'सरकार तुमच्या दारी' असे उपक्रम राबवत असले तरी प्रत्यक्षात त्यांना सामान्य नागरिकांची चिंता नाही. वाढती महागाई आणि त्यात एलपीजी सारख्या दैनंदिन गोष्टींवरील दरवाढीमुळे महिलांवर आर्थिक ताण आला आहे. या अशा महागाईमध्ये जगायचे कसे हा सध्या गोमंतकीयांसमोरील मोठा प्रश्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news