LPG Cylinder Price Hike | हॉटेल व्यावसायिक अडचणीत! व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

LPG Cylinder Price Hike | राज्यातील हॉटेल व्यवसायावर परिणामाची शक्यता
LPG Price Hike
LPG Price HikePudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

तेल विपणन कंपन्यांनी १ जूनपासून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ४२ ते ५३.५० रुपये इतकी वाढ केली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी तसेच लघुउद्योजकांवर होणार आहे.

LPG Price Hike
New Goa | नवीन गोवा वेतन संहिता मसुदा जाहीर

जमेची बाब घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसायावर या दरवाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही महिन्यांपासून वाढती महागाई, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती आणि इतर खर्चामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आता व्यावसायिक गॅसच्या नव्या दरवाढीमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. हॉटेल मालकांसमोर सध्या मोठे आव्हान उभे राहिले आहे.

LPG Price Hike
Supriya Sule Goa Meeting | खासदार सुळे यांच्यासोबतच्या बैठकीत ठरली रणनीती

वाढीव खर्चाचा भार कमी करण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्यास ग्राहकसंख्या कमी होण्याची भीती आहे. दुसरीकडे, दरवाढ न केल्यास वाढीव एलपीजी खर्चाचा आर्थिक बोजा स्वतःलाच सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक लहान आणि मध्यम हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत.

व्यावसायिक संघटनांनी सरकारने वाढत्या इंधन व गॅस दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. दरम्यान, आगामी काळात गोव्यातील स्थानिक खानावळी खाद्यपदार्थांच्या आणि हॉटेलमधील किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news