CM Pramod Sawant | गोव्यातील दूध उत्पादकांसाठी सुधारित कामधेनू योजना लागू!; पहिल्या 10 गाईंसाठी मिळणार 90 टक्के अनुदान"

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : दूध व्यवसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण
Goa CM Pramod Sawant Security
Goa CM Pramod Sawant Security
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील दूध व्यवसाय वाढीव करण्यासाठी (वाढीसाठी) सुधारित कामधेनू योजना गुरुवारपासून सुरू करण्यात येत असून दूध व्यवसायात असलेल्या व्यवसायिकांना २० गायी खरेदी करण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

Goa CM Pramod Sawant Security
Goa Fish Sellers Identity | "गोव्यात 15 वर्षे वास्तव्य असणाऱ्या मासे विक्रेत्यांनाच मिळणार ओळखपत्र!; CM प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा"

पहिल्या दहा गायी खरेदीसाठी ९० टक्के, तर उर्वरित दहा गायी खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान सरकारकडून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात गुरुवारी गोवा डेअरीच्या दूध व्यवसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, गोवा डेअरी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगरसेकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, सहकार निबंधक आशुतोष आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यात सध्या ६० हजार लिटरपर्यंत दूध उत्पादन होते; ते वाढवून दीड लाखांपर्यंत नेले तरी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. माणसांप्रमाणे गुरांनाही २४ तास आरोग्य सेवा मिळावी, यासाठी मोबाईल आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार प्रयत्नशील असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

डेअरी, मत्स्य व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय गोमंतकीयांच्या हाती राहावा, यासाठी भरीव अनुदान आणि सुटसुटीत योजना सरकार राबवत आहे, त्याचा लाभ घ्या. गोव्यात जेवढ्या सोयी सवलती आहेत, तेवढ्या इतर राज्यांत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वागत डॉ. नितीन नाईक यांनी केले. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी तर डॉ. रामा परब यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक सोसायट्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

कुर्टी येथे लवकरच पशुचिकित्सा महाविद्यालय

पारंपरिक उद्योग व्यवसाय शाबूत राहावेत यासाठी पूरक मनुष्यबळाची निर्मितीही करण्यात येत असून राज्यात कृषी महाविद्यालय कार्यरत आहे. आता कुर्टी येथे यावर्षापासून पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.

२०३७ पर्यंत विकसित गोव्याचे स्वप्न साकारूया

मंत्री निळकंठ हळर्णकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून गोमंतकीय उद्योग व्यवसाय शाबूत राहावेत, त्याची वाढ व्हावी, यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. दूध उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांना लाखो रुपयांचे अनुदान सरकार देते, त्याचा योग्य वापर करा आणि व्यवसाय वाढवा. २०३७ पर्यंत विकसित गोव्याचे स्वप्न सर्वजण साकारूया, असे हळर्णकर म्हणाले.

Goa CM Pramod Sawant Security
Goa Maza Flat Scheme | माझा फ्लॅट योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

माझे घर योजनेचा लाभ घ्या : शिरोडकर

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, दूध उत्पादकांचा व्यवसाय वृद्धीसाठी सरकारकडून भरीव अनुदान देण्यात येते त्याचा योग्य लाभ घ्या. मुख्यमंत्री गोव्याच्या विकासासाठी कार्यरत आहेत. माझे घर योजना ही अशीच एक चांगली योजना असून तिचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news