Casino Anjuna Protest| ...तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर चटई आंदोलन

Casino Anjuna Protest| कॅसिनो मालक चिट्टी बाबू घंटा यांच्यावर गुन्हा नोंद करा; युवा काँग्रेसचा पोलिसांना इशारा
Casinos
Casinos file photo
Published on
Updated on

हणजूण : पुढारी वृत्तसेवा

कॅसिनो मालक चिट्टी बाबू घंटा यांच्या विरोधात दोन दिवसांत गुन्हा नोंद न झाल्यास किंवा कारवाई न करण्यात आल्यास सुरू करण्यात आलेले चटई आंदोलन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पणजी येथील निवासस्थानी केले जाईल, असा इशारा गोवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

Casinos
Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

हडफडे येथे बिग बी नामक कॅसिनो चालवणारे चिट्टी बाबू घंटा यांनी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कॅसिनो बंद केल्यामुळे या कॅसिनोत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनापासून मुकावे लागले.

तसेच या कॅसिनोला भाजीपाला फळे व इतर वस्तू पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांना सुमारे दीड कोटींना थकवण्यात आले आहे.

वेतन व पुरवठा केलेल्या सामानाचे पैसे न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी तसेच पुरवठादारांनी कॅसिनो मालक चिट्टी बाबू घंटा, अकाऊंटंट कमलेश परब, ऑपरेशन मॅनेजर मनोज कुमार, अकाऊंटंट करुणा हळर्णकर व परचेस मॅनेजर सिद्धार्थ नाईक यांच्या विरोधात मार्च महिन्यात तक्रार दिली होती. तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकावर चटई आंदोलन केले.

या चटई आंदोलनाचे प्रमुख गजानन तिळवे तसेच काँग्रेस नेते ॲड. शशांक नार्वेकर यांनीही यावेळी चिट्टी बाबू घंटा यांच्यावर कारवाईची मागणी करत या आंदोलनाविषयी माहिती दिली.

हणजूण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कृष्णा सिनरी रजेवर असल्यामुळे कोलवाळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजीत कांदोळकर हे या आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले होते.

दोन दिवसांत कारवाईचे आश्वासन : ॲड. पालेकर

चिट्टी बाबू घंटा या कॅसिनो व्यावसायिकाने येथील स्थानिक जनतेला फसवून फसवणुकीची घंटा वाजवली आहे. त्याच्या विरोधात चार महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. या कृतीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडालेला आहे. पोलीस राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास कचरत आहेत.

पोलिसांनी राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता काम करण्याची गरज आहे. चिट्टी बाबू घंटा याच्या विरोधात एफआयआर नोंद करावा या मागणीसाठी युवा काँग्रेसने हणजूण पोलीस स्थानकावर चटई आंदोलन केले. पोलिसांनी दोन दिवसांत त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते ॲड. अमित पालेकर यांनी बोलताना दिली.

Casinos
Kolhapur News | शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांचा तीव्र आक्रोश; महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

पोलिसांकडून वाचविण्याचा प्रयत्न : खलप

चार महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही चिट्टी बाबू घंटा याच्या विरोधात पोलीस कारवाई करण्यात तसेच सरकार घाबरते का? सदर घंटा हा अनेक लोकांचे पैसे देणे बाकी असताना पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी सांगितले. या कॅसिनोला पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांना जर पैसे मिळत नसतील, तर मुख्यमंत्र्यांचा स्वयंपूर्ण गोवा हा नारा काय उपयोगाचा, अशी विचारणा त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news