Goa Vasco Fire|वास्को आग दुर्घटनेची तथ्यशोधन चौकशी

महसूल सचिवांकडे जबाबदारी; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
goa fire case.
goa fire case.
Published on: 
Updated on: 

Vasco Market Fire Fact Finding Inquiry Revenue Secretary

पणजी : वास्को येथे २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या घटनेची तथ्यशोधन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल सचिवांना या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांनी सर्वसमावेशक अहवाल सात दिवसांच्या आत सरकारला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या चौकशीत संबंधित यंत्रणांची आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी कितपत होती, याचा तपास केला जाणार आहे. तसेच अग्रिशमन दलाची पायाभूत सुविधा, उपलब्ध उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा पुरेशी व कार्यक्षम होती का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

आगीची घटना घडल्यापासून विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईचा क्रम आणि घटनाक्रमही तपासला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागला, आपत्कालीन परिस्थितीत विविध विभाग व संस्थांमध्ये समन्वय कसा होता, याची माहिती चौकशीत घेतली जाणार आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास कोणत्याही प्रकारची प्रशासकीय त्रुटी, हलगर्जीपणा किंवा यंत्रणेतील कमतरता कारणीभूत ठरली का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

चौकशीत तथ्ये स्पष्ट झाल्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित अधिकारी किंवा यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची शिफारसही केली जाऊ शकते. महसूल सचिवांना चौकशीदरम्यान संबंधित विभाग व यंत्रणांकडून आवश्यक कागदपत्रे, नोंदी आणि माहिती मिळविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार संबंधित अधिकारी व व्यक्तींचे स्पष्टीकरण किंवा जबाब नोंदवून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

goa fire case.
Harmal Leopard Attack | हरमलमध्ये बिबट्याच्या दहशतीत वाढ; दोन महिन्यांत कुत्र्याला लक्ष करण्याची चौथी घटना समोर

भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या सुधारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत, तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, याबाबतही चौकशी अहवालात ठोस शिफारशी करण्यात येणार आहेत. चौकशी पूर्ण करून सात दिवसांत सरकारला सर्वसमावेशक अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

goa fire case.
Goa ST Reservation | एसटी राजकीय आरक्षणावर न्यायालयात सरकारची भूमिका विसंगत; विजय सरदेसाई यांचा गंभीर आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.