Calangute Murder Case | कॅसिनोतील हार-जीत ठरली जीवावर! सुरतच्या पर्यटकाची गोव्यात निर्घृण हत्या; 3 मित्रांनी भर रस्त्यात भोसकले

Calangute Murder Case | सुरतच्या युवकाचा मित्रांनीच केला खून : म्हापसा येथे शेतात आढळला मृतदेह
murder case
murder casePudhari
Published on
Updated on

म्हापसा पुढारी वृत्तसेवा

जुगारातील पैशावरून झालेल्या वादातून पर्यटकांच्या एका गटातील तरुणांनी आपल्याच राजभर रामदर्शन मित्राचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना कळंगुट न येथे घडली. ही घटना शनिवारी पहाटे ६ ते ६:३० च्या सुमारास तिवायवाडा, न कळंगुट येथे घडली. राजभर रवीनारायण रामदर्शन (२७, रा. सुरत) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

murder case
Goa Sexual Scandal| गोव्यात 'रेवण्णा-2' तयार झालाय का? कुडचडे प्रकरणावरून काँग्रेसचा भाजप सरकारवर घणाघाती वार

मिळालेल्या माहितीनुसार सुरत, गुजरात येथून गोव्यात आलेला पर्यटक युवकांचा गट तिवायवाडा, कळंगुट येथील कॅसिनो असलेल्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. पहाटेच्या सुमारास कॅसिनोतील आर्थिक व्यवहारावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले.

भांडण विकोपास जाऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातील तीन मित्रांनी राजभर याच्यावर सुरीने हल्ला केला. जखमी राजभर जीव वाचवण्यासाठी जवळच्याच एका रिसॉर्टकडे धावत गेला. मात्र, मित्रांनी त्याचा पाठलाग करून रिसॉर्टच्या स्विमिंग पुलाजवळ त्याला गाठले आणि त्याच्या पोटावर सुरीने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संशयितांनी पळून सुरी त्या स्विमिंग पूल मध्येच टाकून पळ काढला.

murder case
Soham Naik Case Update | कुडचडे प्रकरणाची व्याप्ती वाढली! अजून एक पीडिता समोर; सोहम नाईकच्या मित्रांचे धाबे दणाणले

कळंगुट पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली सुरी जप्त केली आहे. पळून गेलेल्या संशयितांचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

म्हापशात आढळला कान कापलेला मृतदेह

मरड, म्हापसा येथील शेतात एका अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कान कापलेल्या स्थितीत व चेहऱ्यावर जखमा असलेला मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news