Goa Accident News | प्रवासी बसने चिरडल्याने चोवीस तासांत दुसरा बळी

गिरी येथील घटना; कायदा विभागाच्या अवर सचिवाचा मृत्यू
Goa Accident News
नारायण अभ्यंकर(Pudhari File Photo)
Published on
Updated on

म्हापसा : गुडीवाडा-अडणे येथे खासगी बसच्या धडकेत वृद्धा ठार झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटण्यापूर्वीच गिरी-म्हापसा येथे खासगी प्रवासी बसने चिरडल्याने कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर (51, रा. रामनगर, कोलवाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ग्रीनपार्क जंक्शनजवळील उड्डाणपुलाजवळ मंगळवारी सकाळी 10.45 वाजता झाला. ते नेहमीप्रमाणे पर्वरी येथील सचिवालयात कामाला निघाले होते. दरम्यान, बस चालक प्रेमानंद कानोजी याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण अभ्यंकर हे त्यांच्या जीए 03 एएस 8836 क्रमांकाच्या स्कूटरवरून कोलवाळहून पर्वरी येथील सचिवालयाकडे जात होते. त्याचवेळी, जीए 07 एफ 5679 क्रमांकाची प्रवासी बस घेऊन चालक प्रेमानंद कानोजी हा म्हापसा येथून पणजीकडे जात होता. अभ्यंकर यांनी ग्रीनपार्क उड्डाणपूल ओलांडल्यानंतर काही अंतरावर सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येणार्‍या प्रवासी बसने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेमुळे अभ्यंकर यांचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि ते डाव्या बाजूला बसखाली कोसळले, ज्यामुळे चाकाखाली चिरडले गेले. त्यांची स्कूटर उजव्या बाजूने जवळपास 10 मीटरवर जाऊन दुभाजकाजवळ कोसळली.

Goa Accident News
Goa News : गिरी-म्‍हापसा येथे ट्रक पुलावरून कोसळला; एकजण ठार, एक जखमी

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित आणि हवालदार सागर आगरवाडेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला आणि संशयित बस चालकाला ताब्यात घेतले.

Goa Accident News
Goa | विधानसभा अधिवेशनाचे कामकाज आज ठरणार

पंचनाम्यानंतर मृतदेह गोमेकॉमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संध्याकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news