

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा गिरी, म्हापसा येथे मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (बुधवार) दि.24 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गिरी, म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाणपुलावरून जाणारा GA03K0837 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक थेट उड्डाण पुलावरून खाली रस्त्यावर उलटा पडला. या अपघातात सलमान (झारखंड) हा ठार झाला, तर गंभीर जखमी झालेल्याचे नाव समजू शकले नाही. दरम्यान या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली. म्हापसा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :