

पणजी: पुढारी वृत्तसेवा : पणजी येथील काँग्रेस कार्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळ्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा तिरंग्याच्या वरील भागात लावला. त्यामुळे तिरंग्याचा अपमान झाल्याची भावना सर्वत्र पसरली आहे. या प्रकारावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गिरिराज वेर्णेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. Goa BJP
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, हा तिरंग्याचा घोर अपमान असून काँग्रेसने कधीच देश प्रथम ही भावना रुजवली नाही. म्हणूनच देशाचा ते वारंवार अपमान करतात.Goa BJP
भाजपचे प्रवक्ते वेर्णेकर यांनी म्हटले आहे की, देशाचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. नियमानुसार तिरंग्या झेंड्याच्यावर इतर कुठलाही प्रकारचा झेंडा असू नये, मात्र याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही. आणि त्यामुळेच अनेक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाच्या नेत्यानी तिरंग्याचा सन्मान करण्याची शिकवण घेणे गरजेचे आहे. तिरंग्याला खाली ठेवून पक्षाचा झेंडा त्याच्यावर फडकावून काँग्रेसने देश़ाचा व देशवासीयांचा अपमान केला आहे. यापूर्वी याच पक्षाच्या नेत्यांनी राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण धुडवावून लावले होते. भाजपने नेहमीच देश प्रथम ही भावना जागृत केली आहे. मात्र, काँग्रेसला देश नव्हे, तर पक्ष प्रथम वाटतो. हा प्रकार निषेधात्मक आहे.
हेही वाचा