

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या बेकायदा नाईट क्लबमध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सिटिझन्स फॉर डेमोक्रसी या जनआंदोलन कार्यरत नागरिक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात तातडीची हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.
याचिकेत राज्य यंत्रणेचा 'अप्रत्याशित निष्काळजीपणा, भ्रष्ट संगनमत आणि नियमबाह्य परवानग्या' यामुळे ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या नाईट क्लबमध्ये आपत्कालिन बाहेर पडण्याचे मार्ग नव्हता. आग लागली तेव्हा ती विझवण्यासाठी आग प्रतिबंधक उपकरणे नव्हती.
आवश्यक असलेल्या परवानेही नव्हते. धूर व तापमान वाढल्याने अनेक जण श्वसनावरोधामुळे पडले. मृत्युमुखी हस्तक्षेप याचिकादारानुसार ही दुर्घटना केवळ अपघात नसून अनेक सरकारी विभागांनी डोळेझाक केल्यामुळे घडलेली मानवनिर्मित शोकांतिका आहे.
यामध्ये निष्काळजीपणा झाला त्याला हडफडे नागोवा पंचायत, एनजीपीडीए, पंचायत खाते, अग्निशमन व आपत्कालिन सेवा, आरोग्य खाते, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), गोवा पोलिस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा महसूल खाते, दक्षता खाते, किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज व पाणी विभाग जबाबदार आहेत.
फक्त तीन अधिकाऱ्यांचे निलंबन हे केवळ देखावा असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत १९९७ च्या उपाहार सिनेमागृहातील अगीच्या दुर्घटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची व प्रशासनाची फौजदारी जबाबदारी याकडे सरकारचे दुर्लक्ष या दुर्घटनेला जबाबदार आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग नेमावा. गोव्यातील सर्व व्यावसायिक स्थळांचे राज्यव्यापी सुरक्षा ऑडिट पान २ वर