Sadanand Shet Tanavade | चोर्ला घाटाचा जीवघेणा प्रवास; खासदार तानावडे यांची संसदेत तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Sadanand Shet Tanavade | खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी
Sadanand Shet Tanavade
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा ते बेळगाव हे अंतर कमी करण्यासोबतच गोवेकराना बेळगावला सदानंद शेट तानावडे जाण्यासाठी जवळचा ठरलेला चोर्लाघाट-बेळगाव रस्ता खराब झालेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार सदानंद शेट तानावडे यांची संसदेत केली.

Sadanand Shet Tanavade
Margao Illegal Fuel | मडगाव शहर धोक्याच्या छायेखाली; अवैध इंधन साठ्यामुळे धोका वाढला

गुरुवारी ११ रोजी राज्यसभेत तानावडे यांनी ही मागणी केली, गोव्यातून एक महामार्ग अनमोड घाटातून जातो आणि दुसरा चोर्ला घाटातून जातो. हे महामार्ग गोवा आणि कर्नाटक दोन्हीसाठी महत्वाचे आहेत. या दोन्ही महामार्गांवरून दररोज प्रवासी, शेती उत्पादने आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक होते.

त्यातील चोर्लाघार रस्ता कर्नाटकाच्या सीमेमध्ये खूपच खराब झाला आहे. अनमोड घाटमागपिक्षा चोर्ला घाट रस्ता गोव्याला जवळचा पडत असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. गोवा हद्दीत येणारा चोर्ला घाट रस्ता अरुंद आहेत. पावसाळ्यात भूस्खलन होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात अनेकदा घाटात दरडी कोसळत असल्याने हा मार्ग बंद राहतो. अनमोड रस्त्याची स्थितीही अशीच असल्याचे ते म्हणाले. तानावडे पुढे म्हणाले की, दोन्ही महामार्ग जंगल आणि डोंगराळ प्रदेशातून जातात. वैद्यकीय उपचार, शैक्षणिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक गरजांसाठी गोव्याचे बेळगावशी मजबूत जवळचे आहेत.

अनेक लोक उपचार, शिक्षण, खरेदी आणि व्यवसायासाठी वारंवार या मार्गावरून प्रवास करतात. गोव्यातील जवळपास ८० टक्के भाज्या आणि फळे या मार्गांनी राज्यात येतात. नवीन वर्ष जवळ येत असताना, हे महामार्ग योग्य स्थितीत ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Sadanand Shet Tanavade
Night Club Fire Case | हे प्रकरण अत्यंत गंभीर! हडफडेतील दुर्घटनाप्रकरणी रोहिणी न्यायालयाचे लुथरांवर कडक शब्दात ताशेरे

या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाकडे केंद्र सरकारने प्राधान्याने लक्ष देऊन गोमंतकीय जनतेला दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विशेषतः घाटातील भागात भूस्खलन किंवा अपघातादरम्यान दीर्घकाळ अडथळा निर्माण होऊ नये म्हणून योग्य देखरेख, इशारा प्रणाली आणि बचाव व्यवस्थांची आवश्यकता निर्माण करण्यात याव्यात, अशीही मागणी तानावडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news