Goa Badminton Players | ऑल इंडिया जूनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंची संमिश्र कामगिरी

Goa Badminton Players | ऑल इंडिया जूनियर रँकिंग स्पर्धा : अतिद्र, शाहीन, अश्विन, स्पर्श, वेध पुढील फेरीत
Goa Badminton Players
Goa Badminton Players
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या जी.एच. रायसोनी मेमोरियल ऑल इंडिया जूनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या अतिद्र गावकर याने शानदार विजयाची नोंद करत पुढील फेरीत प्रवेश केला. १९ वर्षाखालील मुलांच्या एकरीत त्याने दिल्लीच्या वरदान वर्माचा १६-१४, १६-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

Goa Badminton Players
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

गोव्याचे शाहीन सी. के., अश्विन मन्नाबालाथ, स्पर्श कोलवाळकर आणि वेध लोटलीकर यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत गोव्याच्या काही खेळाडूंनी दमदार खेळ केला, तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. शाहीन सी. के., वेध लोटलीकर, स्पर्श कोलवाळकर आणि अश्विन मन्नाबालाथ यांनी प्रतिस्पर्ध्याकडून वॉकोव्हर मिळाल्याने पुढील फेरी गाठली.

सोहम नाईक याने मध्य प्रदेशच्या मेधांश शर्माविरुद्ध तीन गेमपर्यंत जोरदार संघर्ष केला; मात्र त्याला पराभव पत्करावा लागला. सुधन्वा उडुपा यानेही ओडिशाच्या भार्गव जिवितेशाविरुद्ध लढत दिली; मात्र त्याला विजय मिळवता आला नाही.

Goa Badminton Players
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

ओवेस तहसीलदार आणि शौर्य नाईक यांनी अनुक्रमे महाराष्ट्राच्या यश ढेम्बरे आणि कर्नाटकच्या श्रेयस चंद्रशेखर यांच्याविरुद्ध कडवी झुंज दिली. आर्यन कर्पे आणि वीरादित्य पै काणे यांनीही प्रतिस्पर्ध्यांना चांगली लढत दिली. मुलींच्या १९ वर्षाखालील एकरीत पलक रामनाथकर हिने दिल्लीच्या साक्षी राणाविरुद्ध संघर्ष केला; मात्र तिला पराभवाचा सामना करावा लागला.

जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटातील पाच प्रकारांचा समावेश असून, एकूण ८ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत अर्णव रामनाथकर, राज धुमेश, प्रतीक नाईक बोरकर, नील पुंजानी बक्षी आणि ऋतिका चेचुरी यांचे आव्हान संपुष्टात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news