LPG Crisis Goa | केटरिंग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर गॅस टंचाईचे संकट! केंद्राच्या निर्णयामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

LPG Crisis Goa | दिलासा देण्याची युरी आलेमाव यांच्याकडून मागणी
LPG Price
LPG Crisis Goafile photo
Published on
Updated on

इराण अमेरीका युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशातील केटरिंग व्यवसाय करणाऱ्या व रेस्टॉरंटवाल्यांना मर्यादित गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेले आहे. त्यामुळे रेस्टॉरंट चालक आणि केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

LPG Price
LPG Stock Goa 2026 | युद्धामुळे इंधन टंचाईची भीती नको! गोव्यात महिनाभर पुरेल इतका गॅस साठा उपलब्ध; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

राज्य सरकारने याप्रकरणी त्वरित केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून गोव्यातील व्यवसायिकांना हवे तेवढे सिलिंडर उपलब्ध करण्याची मागणी करावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.

विधानसभेमध्ये शून्य प्रहराला त्यांनी केलेल्या या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, या विषयावर केंद्रीय मंत्र्याशी आपण फोनवर चर्चा केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलास देण्याचे जाहीर केले आहे.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पोंबुर्पा येथील रस्ता खराब झाल्याचे सांगत त्याच्या दुरुस्तीची आणि रुंदीकरणाची मागणी केली, तर आमदार जीत आरोलकर यांनी पेडणे मामलेदार कार्यालय इमारत धोकादायक असल्याचे सांगून सदर कार्यालय इतरत्र हलवावे व नवीन इमारत बांधण्याची मागणी केली.

संकल्प आमोणकर यांनी रवींद्र भवन बायणा येथे तांत्रिक कर्मचारी कमी असल्याचे सांगत ते त्वरित भरण्याची मागणी केली. कला व संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी अनेक रवींद्र भावनांमध्ये कर्मचारी कमी असून लवकरच भरती केली जाईल, असे आश्वासन दिले.

LPG Price
Goa AI Traffic Cameras | गोव्याच्या रस्त्यांवर आता 'एआय'ची नजर! वाहतूक शिस्तीसाठी राज्यभरात 100 स्मार्ट कॅमेरे बसवणार

बिलवाढ नव्हे दंड : मंत्री ढवळीकर आमदार निलेश काब्राल यांनी विजेची बिले जादा येत असल्याची तक्रार केली. त्यावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी खुलासा केला की, अनेक लोक ३ केव्हीचे कनेक्शन घेऊन ८ ते १० केव्ही वीज वापरतात अशांना दंड म्हणून बिलात वाढ झाल्याचे ढवळीकर म्हणाले.

दुहेरी नागरिकत्व द्या : सरदेसाई गोव्यातील जे नागरिक पोर्तुगालमध्ये राहतात त्यांना दुहेरी नागरिकत्व देण्यासाठी गोवा सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी शून्य प्रहाराला सोमवारी केली. पाच वर्षांत गोव्यातील ८,४२५ लोक गोवा सोडून पोर्तुगालचे नागरिक झाल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news