Goa Drug Case | म्हापशात एएनसीचा थरारक छापा; 65 लाखांचे अमली पदार्थ जप्त, अफनान घोरी अटकेत

Goa Drug Case | अफनान घोरी याला अटक; एएनसीची कारवाई
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पोलिस खात्याने गेल्या काही दिवसांपासून अमलीपदार्थविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी काणकोण पोलिसांनी एक कोटीचे कोकेन जप्त केल्यानंतर गुरुवारी (५ फेब्रुवारी) गणेशपुरी म्हापसा येथे पहाटे अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने घातलेल्या छाप्यात ६५ लाखांचे ड्रग्ज जप्त करत म्हापसा येथील संशयित अफनान घोरी याला अटक केली.

Arrest
CM Pramod Sawant | गोवा सरकारचा मोठा निर्णय: स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात ३ हजार रुपयांची वाढ

न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. मिळालेल्या ठोस माहिती व मानवी गुप्तचर माहितीनुसार, एएनसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत कारवाई करत म्हापसा येथील रहिवासी अफनान घोरी याला अडवले व त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक्स्टसी पावडर आढळून आली.

संशयिताची सखोल चौकशी केल्यानंतर एएनसी पथकाने त्याच्या म्हापसा येथील निवासस्थानी छापा टाकला. तेथे एक्स्टसी (१६.८ ग्रॅम्स), गांजा (२१ ग्रॅम) तसेच १२७.७ ग्रॅम वजनाची मोठ्या प्रमाणातील कोकेन असा एकूण सुमारे ६५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. संशयिताचे ड्रग्ज माफियांशी असलेल्या संबंधांची माहिती जमा करण्यात येत आहे.

Arrest
Goa Traffic Police | वाहतूक पोलिसांचा दणका! 2025 मध्ये 9 हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

त्याने हा ड्रग्ज कोणाकडून विकत घेतला व कोठून आणला याची सखोल चौकशी एएनसी पोलिस पथक करत आहे. या प्रकरणाशी नेटवर्क असलेल्यांचा शोध पोलिस घेत आहेत. ड्रग्ज माफियांचे जाळे राज्यात पसरण्यापूर्वीच त्याचा शोध घेण्यासाठी शेजारील राज्यातील पोलिसांचीही मदत एएनसी पोलिस घेत आहेत.

यापूर्वी संशयिताला एएनसीने एप्रिल २०२३ मध्ये ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १.९० लाखाचे १८.४० ग्रॅम मेथाम्फेटमाईन जप्त केले होते. या प्रकरणातील खटला सध्या न्यायालयात सुरू असून तो सशर्त जामिनावर होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news