

पणजी ः मळा - पणजी भागात सांडपाणीच्या वाहिनींसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकीसह पडून रायबंदर येथील माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
हा अपघात दुचाकीस्वाराच्या बेदरकार व निष्काळजीपणामुळे झाला असून त्यामध्ये मानवी हक्काचे उल्लंघन झाले नसल्याचा निष्कर्ष गोवा मानवाधिकार आयोगाने काढत या अपघातप्रकरणी घेतलेली स्वेच्छा याचिका निकालात काढली आहे.गोवा मानवाधिकार आयोगाने असा निष्कर्ष काढला आहे की 1 जानेवारी 2024 रोजी मळा येथे स्मार्ट सिटी बॅरिकेड्सवर आदळून आयुष हळर्णकरचा मृत्यू झाला होता.