

पणजी : जुन्या मांडवी पुलावर शुक्रवारी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात 4 चारचाकी, तर एका दुचाकीचा समावेश होता. या अपघातात दुचाकीवर महिला व तिच्यासोबत असलेले मूल जखमी झाले. त्यांना तत्काळ बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार करण्यात आले.
सिग्नल असल्याने पुढील वाहने थांबली होती, तर काही वाहने पुढे पुढे सरकत होती. इतक्यात एक दुचाकी वाहून नेणारा छोटा पिकअप भरधाव वेगात आला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची धडक पुढच्या कारला बसली. त्याची धडक समोरच्या व त्याची त्याच्यापुढील वाहनाला आणि एका दुचाकीला बसली.