Sangli News : दीड कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त

पेठ येथे उत्पादन शुल्कची कारवाई
Sangli News
दीड कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त
Published on
Updated on

ईश्वरपूर : पुणे - बंगळुरू महामार्गावर पेठनाक्यानजीक (ता. वाळवा) गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सापळा रचून पकडला. या कारवाईत दारूचे १ हजार २०० बॉक्स आणि मालट्रक असा एकूण १ कोटी ४८ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रकचालक सहिराम पोकरराम बिश्नोई (वय ४१, रा. केरियानाडा फिंच, जोधपूर, राजस्थान) याला पथकाने ताब्यात घेतले आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सांगलीचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक निखिल पाटील, संदेश तडवळेकर, मयुरी पाटील, श्रीपाद पाटील, तसेच जवान संतोष वेदे, अभिजित हावळ, सचिन जाधव व बजरंग पाटील यांच्या पथकाने महामार्गावर सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली. सायंकाळी ६ च्या सुमारास संशयित ट्रक (क्र. केए २० एबी ३८६७) अडवून तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १ हजार २०० बॉक्स आढळून आले. पथकाने तत्काळ मुद्देमालासह चालकाला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news