Mandovi Bridge Accident | गोव्यात वेगवेगळ्या तीन अपघातांत दोन कायद्याच्या विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू; सर्वत्र हळहळ व्यक्त

Mandovi Bridge Accident | मृतांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन वाहन अपघातांत तीन युवकांचा, तर एका युवकाचा घरच्या छप्परावरून पडून मृत्यू झाला. नव्या मांडवी पुलावर झालेल्या दुचाकी व कारच्या भीषण अपघातात दोन कायद्याचे विद्यार्थी जागीच ठार झाले. गोवा वेल्हा येथे लष्करी ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात गिरी येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वागाटोर येथे घरच्या वरच्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

नव्या मांडवी पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास दुचाकी आणि टॅक्सीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील कायद्याचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले, तर टॅक्सी चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात पहाटे ३.२३ वाजता घडला.

या अपघातप्रकरणी पर्वरी पोलिसांनी टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या भीषण अपघातात ठार झालेल्यांची नावे कुशाग्र पटाले (वय २१, विक्रोळी- मुंबई) व यश मलिक (वय २०, रोहतक-हरियाणा) अशी आहेत. दोघेही सांकवाळ, मुरगाव येथील इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये कायद्याचे विद्यार्थी आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र क्रमांकाची दुचाकी पर्वरी येथून पणजीच्या दिशेने येत होती, तर टॅक्सी पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात होती. टॅक्सीने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून अतिवेगात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

दरम्यान, टॅक्सी चालक राजकुमार कटिमणी, रा. सांगोलडा, तसेच टॅक्सीमध्ये असलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. गोवा वेल्हा येथे लष्करी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील गिरी येथील मितेश मोहन शेट (वय २२) या तरुणाचा त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

वागाटोर येथे कामगार ठार

वागाटोर येथे घरच्या वरच्या मजल्यावरून पडून कामगार ठार झाला. तो मूळ कर्नाटकचा असून, सध्या आसगाव येथे राहत होता. घरचे काम करत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडला असला, तरी याचा तपास हणजून पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news