FDA Raid Ponda Goa 2026 | फोंड्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले! अस्वच्छता अन् बिनापरवाना व्यवसायावर एफडीएची मोठी कारवाई

FDA Raid Ponda Goa 2026 | विनापरवाना व्यवसाय, अस्वच्छता व नियमभंगाविरोधात हजारोंचा दंड
FDA Raid Ponda Goa 2026
FDA Raid Ponda Goa 2026
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यात २ मार्च २०२६ रोजी उशिरा सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील विविध भागांमध्ये बिनापरवाना व अस्वच्छ परिस्थितीत सुरू असलेल्या अन्न व्यवसायांची पाहणी करण्यात आली.

FDA Raid Ponda Goa 2026
Mandovi Casino Protest | मांडवी नदीत 'भव्य' कॅसिनोला विरोध! पणजीकरांनी गाठले मुख्यमंत्र्यांचे दालन; परवाना रद्द करण्याची मागणी

या कारवाईदरम्यान १३ फेरीवाल्यांना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम ३१(२) अंतर्गत बिनापरवाना नोटिसा बजावण्यात आल्या. संबंधित फेरीवाल्यांकडे वर्तमानपत्रांचा अन्न पॅकिंगसाठी वापर, परिसरातील अस्वच्छता, योग्य पोशाखाचा अभाव तसेच झाकण व पेडल असलेली कचरापेटी नसणे अशा विविध त्रुटी आढळून आल्या.

त्यांना नमूद केलेल्या त्रुटी तत्काळ दूर करून वैध भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण नोंदणी प्रमाणपत्र/परवाना निर्धारित मुदतीत घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच केळीच्या घाऊक विक्री व्यवसायात असलेल्या एका अन्न व्यावसायिकावर तपासणी अहवालातील सूचनांचे पालन न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.

FDA Raid Ponda Goa 2026
Goa Environmental Protection | गोवा नगर नियोजन कायद्यातील हीच आहेत ती वादग्रस्त कलमे

या मोहिमेच्या पुढील टप्प्यात १ किरकोळ विक्रेता आणि ५ फास्ट फूड केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ आस्थापनांना बिनपरवाना नोटिसा व तपासणी अहवाल देण्यात आला. अस्वच्छ व अस्वास्थ्यकर परिस्थितीत व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल संबंधितांवर दंड आकारण्यात आला.

तसेच, परिसरात 'नो स्मोकिंग' फलक न लावल्याबद्दल कोटपा अंतर्गतही दंड करण्यात आला. बिनापरवाना अन्न व्यवसाय चालवल्याबद्दल संबंधित अन्न व्यावसायिकांकडून एकूण २९ हजार हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 'नो स्मोकिंग' फलक न लावल्याबद्दल ८०० रुपये दंड आकारण्यात आला.

ही मोहीम संचालिका श्वेता देसाई यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी शिवदास नाईक तसेच अन्न सुरक्षा अधिकारी केयने काव्र्व्हलो, अभिषेक नाईक व आत्माराम नाईक यांनी संयुक्तपणे राबविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news