Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

Goa Tourism Fraud | सासष्टी परिसरातील प्रकार; पर्यटन क्षेत्राची प्रतिमा धोक्यात
Goa Romeo Lane Demolition
Goa Romeo Lane Demolition
Published on
Updated on

मडगाव : रविना कुरतरकर

प्रमुख सासष्टीच्या समुद्रकिनाऱ्यांवर तसेच शहरात ठिकठिकाणी भरदिवसा परप्रांतीय महिलांकडून पर्यटकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. कृत्रिम दागिन्यांची विक्री, खोटी माहिती देणे तसेच तेल मालिश करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रकार वाढल्याने पर्यटन क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे.

Goa Romeo Lane Demolition
Utpal Parrikar Panaji Election | पणजीला 'पिता-पुत्राच्या' कचाट्यातून वाचवा! उत्पल पर्रीकर आणि 'आप'चा महापालिकेत एकत्र एल्गार

या प्रकाराला पर्यटक कंटाळले असून अशा भामट्यांपासून पळ काढण्याची वेळ पर्यटकांवर ओढवली आहे. दक्षिण गोव्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या या किनाऱ्यांवर तसेच सासष्टीत स्थानिकांसह प्रत्येक ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

याच संधीचा फायदा घेत काही परप्रांतीय महिला किनारी भागांत कृत्रिम दागिन्यांची विक्री करताना दिसतात. तसेच काही जणी स्वतःला पर्यटन मार्गदर्शक म्हणून सादर करून पर्यटकांना विविध स्थळांची खरी-खोटी माहिती देत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

Goa Romeo Lane Demolition
Casino Issues Panjim | कॅसिनोच्या कचाट्यातून पणजीला सोडवणार! महापालिका निवडणुकीसाठी उत्पल पर्रीकरांचा मास्टर प्लॅन

पर्यटक किनाऱ्यावर दाखल होताच त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्या मागे पुढे फिरणे, संवाद साधून विश्वास संपादन करणे आणि विविध वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करणे, असे प्रकार घडत आहेत. सवलतीच्या दराचे आमिष दाखवून अधिक पैसे उकळल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. कायदा व सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करून बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्वतःला टुरिस्ट गाईड संबोधणारे पर्यटकांची फसवणूक करताना मडगाव शहरात हमखास दिसून येतात. सुरुवातीला गोड गोड बोलून ते पर्यटकांची लुबाडणूक करतात. एखाद्यावेळी त्यांना पकडल्यास त्या त्यांच्याशी हुज्जत घालताना दिसतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत.

- जेम्सन डिसोजा, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news