Goa Fraud Case | कर्मचारी असल्याचे भासवून पुण्यातील भामट्याकडून गोव्यातील महिलेची 5 लाखांची फसवणूक

Goa Fraud Case | या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून एका भामट्याला अटक केली असून, आर्थिक फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Goa Fraud Case
Goa Fraud Case
Published on
Updated on
Summary
  • जीएसपीसीबी कर्मचारी असल्याचे भासवून महिलेची ५ लाखांहून अधिक फसवणूक

  • बनावट पावत्या व संमतीपत्रांच्या आधारे डिजिटल व्यवहार

  • गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला पुण्यातून अटक केली

  • आरोपीकडून दोन मोबाईल फोन जप्त; बनावट कागदपत्रांचा संशय

  • आरोपीवर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रात मिळून १० फसवणुकीचे गुन्हे

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात (GSPCB) सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून बनावट पावत्या व संमतीपत्रे तयार करत काणकोण येथील एका महिलेची तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून एका भामट्याला अटक केली असून, आर्थिक फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Goa Fraud Case
Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सूरज विवेक पेंडसे उर्फ सिद्धार्थ (रा. आसगाव, बार्देश, गोवा; मूळ रहिवासी पुणे, महाराष्ट्र) असे आहे. तो स्वतःला जीएसपीसीबीचा सरकारी कर्मचारी असल्याचे खोटे भासवत होता. या प्रकरणाची तक्रार काणकोण येथील चेतन विजय कोमरपंत (रा. ओंकार बिल्डिंग, चौडी, काणकोण) यांनी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ मे २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत संशयिताने तक्रारदाराच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित कामाची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे सांगितले. काम पूर्ण झाल्याचे भासवून त्याने बनावट पावत्या आणि दोन खोटे संमतीपत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने वेगवेगळ्या वेळी डिजिटल माध्यमातून एकूण ५,०३,००० रुपये तक्रारदाराकडून उकळले.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात संशयित पुण्यात लपल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वारजे परिसरात जाऊन वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या मदतीने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.२९ वाजता त्याला अटक केली.

Goa Fraud Case
Illegal Sand Mining | नायगाव येथे गोदावरीत अवैध वाळू तस्करीवर पैठण पोलिसांची धडक; 12.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

अटकेवेळी संशयिताकडून दोन मोबाईल फोन पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल फोन बनावट पावत्या व संमतीपत्रे तयार करून पाठवण्यासाठी वापरले गेले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संशयितास काणकोण येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दि. २८ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का, तसेच फसवणुकीचा पैशाचा माग कसा लागतो, याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, तपासात सूरज पेंडसे उर्फ सिद्धार्थ याच्यावर यापूर्वीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर गोव्यात ८, कर्नाटकात १ आणि महाराष्ट्रात १ असे एकूण १० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सतत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news